मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट जाणकारांकडून आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या चांगल्या कमाईचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणेच 'गली बॉय'ने पहिल्याच दिवशी 18.70 करोड रूपयांची कमाई केली आहे. कोणताही सुट्टीचा दिवस नसतानाही 'गली बॉय'ने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली. चित्रपट व्हेलेंटाइन डेला प्रदर्शित झाल्याने दुपार आणि सायंकाळच्या शोजमध्ये प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. याचा मोठा फायदा चित्रपटाला झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि आलियाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. जोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 18 करोडहून अधिक  गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी 'गली बॉय'ने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत धुमाकूळ घातला आहे. जगभरात 'गली बॉय' 4101 स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला  हे. भारतात 3350 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे.  




 



मुंबईतील स्लम भागात राहणाऱ्या एका मुलाचा रॅपर बनण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास 'गली बॉय'मध्ये दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, कल्की, विजय राजसह इतरही कलाकारांनी अतिशय उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून सुपरहीट प्रतिक्रिया मिळत आहेत.