नवी दिल्ली : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. दरवेळी यासंदर्भात नवी माहिती समोर येत असते. माध्यमांमधूनही लग्नाच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत. दोघांच्या 'पद्मावत'ने बॉक्स ऑफिस चांगला गल्ला गोळा केला. या दोघांनी लवकरात लवकर लग्नाच्या बंधनात अडकावे अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. या दोघांनीही यासंदर्भात कोणतीही माहिती बाहेर दिली नाही पण रणवीर एका मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोललाय. आमच्या लग्नाच्या बातम्या केवळ अफवा आहेत असे त्याने सांगितले. दीपिकासोबतच लग्न होणार ही गोष्ट मी छतावर चढून ओरडून सांगू शकतो असेही त्याने सांगितले. पण लग्न नेमकं कधी होणार यासंदर्भात त्याने बोलणे टाळले.


यावर्षी नाही लग्न 


दिपिका आणि मी आपआपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहोत. तसेच दिपिकाला बॅकपेनचाही त्रास होतोय. आपल्या पाठीवर पट्टा लावून तिला फिराव लागतयं. काहीही असलं तरी ते लग्न करणार हे तर यातून स्पष्ट झालयं.