मुंबई : 'गली बॉय' सिनेमाच्या यशानंतर रॅप गाण्यांना एक वेगळी ओळख मिळाली. अशात रॅपर कूलियोने (Rapper Coolio)  चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण कूलियोच्या  (Gangsta's Paradise)  निधनाची बातमी चाहत्यांच्या काळजाला चटका लावणारी आहे. वयाच्या 59 व्या वर्षी कूलियोने अखेरचा श्वास घेतला.  कूलियोचं लॉस एंजेलिस येथे निधन झालं. कुलिओ हा ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards ) विजेता आहे.  कुलिओच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कूलियोचा मॅनेजर आणि मित्राने (Rapper Coolio Manager) सांगितल्यानुसार कुलिओ त्याच्या मित्राच्या घरात बाथरुमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. पण कोलियोच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. 


या गाण्यामुळे कूलियोला मिळाली नवी ओळख
कूलिओने 80 च्या दशकात कॅलिफोर्नियामध्ये रॅपिंग करिअरला सुरुवात केली होती, परंतु 1995 मधील 'गँगस्टा पॅराडाइज' गाण्याने त्याला खरी ओळख मिळाली. हा साउंडट्रॅक 'डेंजरस माइंडट' सिनेमात होता. कूलिओला 'गँगस्टा पॅराडाइज' गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.


Gangsta Paradise गाण्याच्या यशानंतर, Coolio ने अनेक गाणी रचली ज्यामुळे रॅपरला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. Aw, Here It Goes!, My Soul,Kenan & Kel यांसारख्या अनेक गाण्यांना कूलियोने स्वतःचा आवाज दिला. 


Coolio चे सिनेमे आणि टीव्ही शो
कूलियो हा रॅपरसोबतच एक उत्तम अभिनेताही होता. त्याने अनेक सिनेमे आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. कूलियोने आपल्या अभिनय कारकिर्दीला मार्टिनसोबत सुरुवात केली. यानंतर तो टीव्ही स्पिनऑफ, बॅटमॅन आणि रॉबिन, मिडनाईट मास यांसारख्या अनेक शोमध्ये दिसला आहे.