Rapper Yo Yo Honey Singh Girlfriend: मागच्याच महिन्यात यो यो हनी सिंग या सुप्रसिद्ध रॅपरचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर यो यो हनी सिंगचं कुणाला डेट करतोय का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातून आता नव्याने व्हायरल झालेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा हनी सिंगच्या गर्लफ्रेंडच्या चर्चांना उधाण आलं आहे. हनी सिंगने काही दिवसांपूर्वी एका रहस्यमय महिलेच्या हातात हात पकडलेला एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. शेअर केलेल्या फोटोमध्ये नुसते हात दिसत आहेत. हनी सिंगसोबत ती महिला कोण आहे याचा अंदाज लागलेला नाही. कारण चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. ही पोस्ट पाहिल्यानंतर यूजर्स असा दावा करू लागले की ती मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी आहे. घटस्फोटानंतर हनी सिंगला नवा जोडीदार मिळाला असल्याची चर्चा होती. (Rapper Yo Yo Honey Singh Girlfriend he is seen with an mysterious lady photos went viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच वेळी काहींनी सांगितले की ही त्यानं दिलेली कोणती डेटिंग हींट नसून हे त्याच्या आगामी गाण्याचं प्रमोशन आहे. गेल्या महिन्यातच हनी सिंगचा घटस्फोट झाला. आता हा फोटो समोर आल्याने यूजर्सनी कमेंट्समध्ये हनी सिंगच्या लव्ह लाईफबद्दल कमेंट करायला सुरुवात केली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हनी सिंगचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे आमच्याबद्दल, मी आणि तुमच्याबद्दल आहे. माझे टुगेदर फॉरएव्हर गाणे आता बाहेर आले आहे. तुमच्या प्रियजनांसोबत रील करा.’ एका यूजरने पोस्टवर कमेंट केली, 'टीना मॅडम.' एका यूजरने लिहिले, 'तुम्ही काय आता त्याला मिस करत आहात का.' दुसऱ्याने लिहिले, 'नवीन भाभी?' युजरने लिहिले की, नव्या वहिनी आल्या आहेत का?' एका चाहत्याने कमेंट केली, 'नव्या आयुष्यासाठी अभिनंदन यो यो.' 



हनी सिंगने शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या चाहत्यांना ती टीनाच असल्याचा दाट संशय आहे. टीना यापुर्वी एक फोटो शेअर केला होता ज्यात तिनंही तेच ब्रेसलेट घातलं होतं जे हनी सिंगच्या फोटोतल्या बाईचंही तसंच आहे. तर काहींना असं वाटतंय की हनी सिंगनं हा फोटो थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.


हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशी लग्न केले होते. 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता आणि गेल्या महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला होता. रिपोर्टनुसार, हनी सिंगने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिले.