मुंबई : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... सोमवारी अनेकांनी आपल्या खास व्यक्तींसोबत व्हॅलेंटाईन डेचा आनंद घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीमधील काही कपल चर्चेत होते. त्यामुळे ते कसे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, याकडे सर्वाचं लक्ष होतं... अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी देखील व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीत साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅलेंटाईन डेपूर्वी राकेशने शमिताला महागड व्हॅलेंटाईन डे गिफ्ट देखील दिलं. त्यांनी समुद्राच्या मध्यभागी योटवर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)


व्हिडीओ मध्ये दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. दोघांच्या व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. अशात राकेशची पहिली पत्नी आणि टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगराने प्रतिक्रिया दिली आहे. 


व्हिडीओवर कमेंट करत रिद्धी म्हणते, 'तुम्हा दोघांची जोडी अशीचं राहो.....' याआधी देखील रिद्धीने राकेश आणि शमिताच्या नात्यावर राकेशच्या पहिल्या पत्नीने आनंद व्यक्त केला


रिद्धी म्हणाली, 'या नात्यामुळे राकेश आनंदी आहे तर मी देखील आनंदी आहे... राकेशचा वैयक्तिक प्रश्न आहे.. असं देखील रिद्धी म्हणाली. एवढंच नाही तर राकेश आणि शमिता लग्न करणार असल्याचं देखील समोर येत आहे.