मुंबई : अभिनेता रणवीर सिंह नेहमी हटके स्टटाईलमध्ये दिसतो. सेलिब्रिटी पार्ट्यांमध्येही सर्वांपेक्षा वेगळा पेहराव, वागणं-बोलणं यामुळे तो नेहमीचं चर्चेत असतो. कूल अभिनेता अशीच त्यांची ओळख आहे. पण या कूल अभिनेत्याच्या रागाचा सामना एका तरुणाला करावा लागला. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या तरुणाला रणवीर सिंहने चांगलचं सुनावलं. पण या तरुणाने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत ट्विटरवर शेअर केला. एवढंच नव्हे तर रणवीर सिंह फ्लॉप अभिनेता असल्याचेही त्याने लिहिले.


रणवीर भडकतो तेव्हा...



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ ऑगस्टला ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. यामध्ये रणवीर सिंह रस्त्यावरुन कारने जात असताना शेजारच्या कारच्या शेजारी आपली कारण आणतो आणि शेजारी कार चालविणाऱ्या तरुणावर भडकतो. कार चालविणाऱ्या त्या तरुणाने रणवीरचा व्हिडिओ बनविलायं.


रणवीरला अक्कल नाही 



'रणवीर उद्धट असून त्याला बोलण्याची अक्कल नाही. कोण आई-बहिणीसमोर शिव्या एखाद्याला शिव्या देतो ? वेड्या माणसा जर असाच तुझा अॅटीट्यूड राहिला तर एक दिवस तू रस्त्यावर येशील' असे त्याने ट्विट केले. पण यावर रणवीरचे फॅन त्या तरुणाची खिल्ली उडवली.


प्रतिक्रिया नाही 


तुझी फॅमिली किंवा आई-बहिण तुला नीट गाडी चालवायला सांगत नाहीत का ?, बरं झाल रणवीर तुला ओरडला...जर मी असतो तर मारलं असतं. असं काही यूजर्सनी रिट्विट केलंय. दरम्यान याप्रकरणावर रणवीरची काही प्रतिक्रिया आली नाही. रोहित शेट्टीच्या सिम्बा सिनेमाच्या शूटींगमध्ये तो व्यस्त आहे.