रिलेशनशीपवर Rashmika Mandana चं मोठं वक्तव्य म्हणाली, `लवकरच आम्हाला दोघांना....`
साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनल्यानंतर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आता बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनल्यानंतर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आता बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिकाचा 'गुडबाय' हा पहिला हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रश्मिका हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. नुकतंच तिने आपल्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे.
वास्तविक, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा येत असतात. या प्रकरणावर दोघंही उघडपणे कधीही काहीही बोलले नाहीत. मात्र, आता एका मुलाखतीदरम्यान रश्मिकाला तिच्या या अभिनेत्यासोबतच्या नात्याबद्दल विचारलं असता तिने त्याला क्यूट म्हटलंय.
ती म्हणाली, 'होय, जेव्हा आम्हाला इंडस्ट्री कशी होती हे माहित नव्हतं तेव्हा विजय आणि मी एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे, '. रश्मिकाने पुढे सांगितलं की, या दोघांची विचारसरणी अनेक बाबतीत सारखीच आहे, त्यामुळेच त्यांची मैत्रीही झाली आणि त्यानंतर दोघांचेही बरेच कॉमन फ्रेंड्स आहेत, त्यामुळे त्यांची मैत्री लवकर झाली.
लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करू शकतो
रश्मिका मंदान्ना पुढे म्हणाली, 'मला लवकरच त्याच्यासोबत काम करायचं आहे. आम्ही चांगले कलाकार आहोत आणि आम्ही दिग्दर्शकांना निराश करणार नाही. या दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या दोन चित्रपटात काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
'कॉफी विथ करण'मध्ये विजयने हे सांगितलं होतं
करण जोहरच्या टॉक शोमध्ये विजय देवरकोंडालाही रश्मिका मंदान्नासोबतच्या डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी या गोष्टीला दुजोरा किंवा इन्कारही केला नाही. तो म्हणाला होता, 'आम्ही आमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात दोन चित्रपट एकत्र केले आहेत. ती खूप गोड आहे आणि मला ती आवडते. आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. चित्रपटांच्या माध्यमातून आपण खूप काही, खूप चढ-उतार शेअर करतो. आमचा दोघांचा खूप चांगला बॉंन्ड आहे'.