`पुष्पा` फेम रश्मिका मंदानाचा फिटनेस फंडा, जाणून घ्या
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नुकतीच `पुष्पा: द राइज`मध्ये दिसली.
मुंबई : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नुकतीच 'पुष्पा: द राइज'मध्ये दिसली. या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच रश्मिका तिच्या फिटनेसबाबतही खूप गंभीर आहे. रश्मिका मंदानाला भारताची 'नॅशनल क्रश' देखील म्हटलं जातं. पण तिच्या फिटनेस मागे अभिनेत्रीचा वर्कआउट आणि कडक डाएट प्लॅन आहे.
रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे डान्स आणि फिटनेस व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचबरोबर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वर्कआउट करायला कधीच चुकत नाही. रश्मिका आठवड्यातून 4-5 वेळा जिममध्ये जाते. तिच्या वर्कआउट्समध्ये कोर आणि वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, जेव्हा ती जिममध्ये जाऊ शकत नाही, तेव्हा ती घरी पॉवर योगा, झुंबा, किक बॉक्सिंग आणि स्विमींग करते.
वर्कआऊटसोबतच रश्मिका मंदान्ना तिच्या डाएटचीही खूप काळजी घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सकाळी पाण्यात थोडसं अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून पिते. तसेच, तिला होम मेड फूड आवडतं. रश्मिका मंदान्ना भात, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ टाळते. याशिवाय रश्मिका तिच्या आहारात रताळं, सूप, सिझनल फळं आणि नारळपाणी यांचा समावेश करते.