मुंबई :  रश्मिका मंदान्ना सर्वांच्याच आवडीची अभिनेत्री आहे. फक्त साऊथच नाही. तर तिला देशात सर्वत्र ओळखले जाते. म्हणून तर तिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली आहे. तिचं बोलणं, तिचे हावभाव, तिचं वागणं याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. त्यात आता पुष्पा या सिनेमामुळे तिला आणखी जास्त ओळख मिळाली आहे आणि यातुन तिने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. अल्लू अर्जुनचा पुष्प: द राइज हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 300 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, चित्रपटाने केवळ हिंदी आवृत्तीत 89 कोटींची कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या यशामुळे रश्मिका खूप खूश आहे. तिने अलीकडेच बॉलीवूड लाईफशी संवाद साधला आणि आपल्या चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


यासोबतच आता चित्रपटाच्या पुढील भागाचे म्हणजेच पुष्पा: द रुलचे शूटिंग कधी सुरू होणार याबद्दल रश्मिकाने वक्तव्य केलं आहे.


रश्मिकाला विचारण्यात आले की हा चित्रपट इतका यशस्वी होईल हे तिला माहीत होते का? यावर ती म्हणाली, "पुष्पा हा एक चित्रपट आहे ज्यावर आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. याबद्दल माझा सहकलाकार (अल्लू अर्जुन) देखील नेहमीच म्हणतो की या चित्रपटात चार चित्रपट इतकीच मेहनत घेतली आहे.  मी फक्त एवढेच सांगेण की हा सिनेमा लोकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातो.


पुढे अभिनेत्री म्हणते, "खरे सांगायचे तर, मला याची कल्पना नव्हती. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे आणि मी याआधी असे काही केले नव्हते. त्यामुळे जर तुम्ही असे यापूर्वी काही केले नसेल तर तुम्ही त्याच्याकडून काही अपेक्षा करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की, ते खूप मोठे असेल, पण ते किती मोठे असेल हे तुम्हाला माहीत नाही. मला पुष्पा बद्दल विश्वास वाटत होता कारण त्यासाठी मी सगळ्यांची मेहनत पाहिली आहे. आम्ही लोकांना काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे मला माहीत होतं."


जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की पुढचा भाग कधी शूट होणार आहे, तेव्हा ती म्हणाली, "मला माहित नाही की, मी ते उघड करू शकेन की नाही (ती हसते). पण लवकरच.''