बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूचं (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) कौतुक केलं आहे. अटल सेतू पाहिल्यानंतर तिने असं काही होऊ शकतं याची कोणी कल्पना केली होती अशा शब्दांत स्तुतीसुमनं उधळली. आता आपण सहजपणे मुंबई ते नवी मुंबई प्रवास करु शकतो. भारत आता फार वेगाने प्रवास करत असून, गतीने विकास होत आहे. आता कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही असं रश्मिकाने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आता 2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात करु शकतो. यावर खरं तर विश्वासच बसत नाही. असं काही शक्य होऊ शकतं असा कोणी विचार केला होता. आज नवी मुंबई ते गोवा, गोवा ते मुंबई आणि बंगळुरुपासून मुंबईपर्यंतचा प्रवास अगदी सहज करण्यात आला आहे. इतक्या उत्तम पायाभूत सुविधा उभारल्याचं पाहून मला फार अभिमान वाटत आहे," अशी भावना रश्मिकाने व्यक्त केली आहे. 



"भारताने आता नकार ऐकणं बंद केलं आहे. भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही. भारतात हे शक्य नाही किंवा भारतासाठी हे अशक्य आहे असं कोणीह मदत नाही. ज्याप्रकारे गेल्या 10 वर्षात भारताने केलेला विकास, पायाभूत सुविधा, रस्त्यांची योजना हे सगळंच जबरदस्त आहे," असंही रश्मिका म्हणाली आहे.


"मला आताच समजलं की अटल सेतूचं काम फक्त 7 वर्षांत पूर्ण झालं आहे. 20 किमीचा हा पूल फक्त 7 वर्षांत उभा करणं हे जबरदस्त आहे. माझ्याकडे कौतुकासाठी शब्द नाही," असं रश्मिकाने सांगितलं आहे. पुढे ती म्हणाली की, "यंग इंडिया आता वेगाने विकास करत आहे. भारत आता सर्वात हुशार देश आहे असं मी म्हणू शकते. तरुण आता फार जबाबदार आहेत. ते कोणाच्याही म्हणण्याने प्रभावित होत नसून, फार हुशार झाले आहेत".