मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. रश्मिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या रश्मिका ‘गुडबाय’ (Goodbye) या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशमनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच रश्मिकानं ‘डीआयडी सुपर मॉम्स 3’ (DID Super Moms 3) शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रश्मिका आणि गोविंदाचा (Govinda) धम्माल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘डीआयडी सुपर मॉम्स ३’ फिनालेचा प्रोमो झी टिव्हीच्वया अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये रश्मिका आणि गोविंदा यांनी पुष्पा चित्रपटातील सामी सामी गाण्यावर डान्स केला आहे. प्रोमोत ते या गाण्याची हूक स्टेप करत आहेत. गोविंदानं सामी सामीची हूक स्टेप जशीच्या तशी केली. गोविंदाला डान्स करताना पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला. (Rashmika Mandanna And Govind s Dance On Sami Sami Song From Pushpa Movie Watch Video )


आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip



आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!


बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, भाग्यश्री आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा हे या शोचे परिक्षक आहेत. यंदाच्या एपिसोडमध्ये रश्मिका आणि गोविंदानं पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. दरम्यान रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला आहे.