नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!

आराध्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसले तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. 

Updated: Sep 24, 2022, 02:32 PM IST
नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) शोमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachcahn) स्पर्धकांना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. बऱ्याचवेळा स्पर्धक बिग बींसमोर त्याच्या मनातील गोष्टी मोकळेपणानं बोलताना दिसतात. काही वेळा तर स्पर्धक अमिताभ यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मजेशीर प्रश्न विचारताना दिसतात. यावेळी एका स्पर्धकानं अमिताभ बच्चन यांना त्यांची नात आराध्या बच्चन आणि तिच्यासोबतच्या बॉंडिंगवर प्रश्न विचारला. (Amitabh Bachchan Granddaughter Aaradhya Bachchan)

आणखी वाचा : Amitabh Bachchan यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार? ऐश्वर्याच्या Video वर कमेंटचा वर्षाव, काय सत्य आणि असत्य

20 वर्षीय वैष्णवी हॉटसीटवर येताच तिनं अमिताभ यांना त्यांची नात आराध्या बच्चनबद्दल अनेक प्रश्न विचारले. वैष्णवीनं बिग बींना विचारलं की ते त्यांच्या नातीला किती वेळ देतात. या प्रश्नाला उत्तर देत अमिताभ म्हणाले, 'तंत्रज्ञानाबद्दल धन्यवाद, आम्ही फेसटाइमद्वारे जोडलेले राहतो.' 

आणखी वाचा : Arjun Kapoor नं Anushka Sharma च्या पोस्टवर केली Negative Comment?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर 

पुढे अमिताभ म्हणाले, 'मी तिला जास्त वेळ देऊ शकत नाही, पण हे निश्चित करतो की तिला वेगळ्या अंदाजात तिच्यासोबत वेळ घालवतो.  मी सकाळी 7 ते 7:30 च्या दरम्यान कामावर निघतो. ती 8 ते 8:30 ला शाळेत जाते. ती 3 ते 4 च्या दरम्यान येते आणि नंतर गृहपाठ करून तिची आई (Aishwarya Rai Bachchan) तिला सांगते तसे ती करते. मी घरी उशीरा पोहोचतो तोपर्यंत तिला झोपते.'

आणखी वाचा : सुकेश चंद्रशेखरनं Jacqueline Fernandez ला..., जॅकलिनच्या स्टायलिशचा धक्कादायक खुलासा

यासोबतच बिग बी म्हणाले की, 'जेव्हा आराध्या रविवारी फ्री असते, तेव्हा मी तिच्यासोबत थोडावेळ खेळतो. तिला जेव्हा माझा राग येतो तेव्हा मी तिला चॉकलेट आणि मुली केसात काय घालतात? हेअर बँड, गुलाबी रंग तिला आवडतो मग मी तिला गुलाबी रंगाचा हेअर बॅंड आणि क्लिप गिफ्ट करतो. मग ती आनंदी होते.' (This Is What Amitabh Bachchan Gifts His Granddaughter Aaradhya When She Gets Upset With Him Know What Big B Said) 

आणखी वाचा : 2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमिताभ बच्चन लवकरच रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्यासोबत 'गुडबाय'(Goodbye) चित्रपटात दिसणार आहेत. विकास बहल (Vikas Bahl) दिग्दर्शित हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अमिताभ सूरज बडजात्याचा (Sooraj Barjatya) 'उंचाई' (Uunchai) या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत अनुपम खेर (Anupam Kher), डॅनी डेन्झोपांग(Danny Denzopang), बोमन इराणी (Boman Irani), नीना गुप्ता (Neena Gupta) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) दिसणार आहे. त्यानंतर Project K या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), प्रभास (Prabhas) आणि दिशा पटानी (Disha Patani) दिसणार आहेत.