मुंबई : रातो-रात नॅशनल क्रशचा टॅग मिळवणारी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सुपरस्टार रश्मिका मंदान्ना नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. पुष्पाच्या सक्सेसनंतर अभिनेत्रीला श्रीवल्ली या नावाची लॉटरी लागली आहे. साऊथ सिनेमा बरोबरच रश्मिका बॉलिवूडमध्येदेखील पदार्पणा करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या १७ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी रश्मिका शिक्षणातही मागे नाही. एक्टिंगसोबत शिक्षणातही बॉलिवूडमध्येही बऱ्याच मोठ-मोठ्या एक्ट्रेसला रश्मिकाने मागे टाकलं आहे. आज आम्ही तुम्हाला पुष्पाच्या श्रीवल्लीचं शिक्षण किती झालं आहे याबद्दल सांगणार आहोत.


कर्नाटकमध्ये जन्मलेल्या रश्मिका मंदान्नाचा जन्म 5 एप्रिल 1996 मध्ये झाला. रश्मिकाने आपलं शालेय शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमधून घेतलं. अभिनेत्रीने एमएस रमैया कॉलेजमधून सायकलॉजी आणि जर्नालिझममध्ये शिक्षण घेतलंय. रश्मिकाला ट्रॅव्हलिंग आणि जिमिंगची खूप आवड आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री खूप वर्कआऊट करते. रश्मिका सुरुवातीपासूनच आपल्या आई-वडिलांची लाडकी मुलगी आहे.  मात्र आपल्या कामापुढे अभिनेत्री कोणाचंच ऐकत नाही. 
 


रश्मिकाने वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.  आणि रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार कधी आणि कशी बनली. हे अभिनेत्रीला स्वत:ला देखील समजलं नाही.  इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत.पुष्पा सिनेमाच्या यशानंतर, रश्मिकाकडे सुपरहिट चित्रपटांची लाईन लागली आहे. बड्या-बड्या दिग्दर्शकांना पुष्पाच्या श्रीवल्लीसोबत काम करण्याची ईच्छा आहे. आणि लवकरच अभिनेत्री मिशन मजनू सिनेमातू सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.