Rashmika Mandanna Viral Video: अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या हॉट आणि क्यूट पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. आज दाक्षिणात्त्य चित्रपटांनाही जागतिक प्रेक्षक मिळाला आहे. त्यामुळे हे कलाकारही जगात लोकप्रिय आहेत. रश्मिकाचं नावंही खूप फेमस आहे. ती कुठेही स्पॉट झाली तरी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते (Rashmika Madanna Spotted) आतूर असतात. या सेलिब्रेटींचे नानातऱ्हेचे व्हिडीओही व्हायरल होत असतात आणि ट्रोलही होताना दिसतात. काही दिवसांपुर्वी रश्मिका चिकन बर्गरची जाहिरात केल्यानं ट्रोल झाली होती. त्यानंतर आता रश्मिका पुन्हा ट्रोल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चाहते तिच्या मागे सेल्फी घेण्यासाठी इतकी गर्दी करत आहेत यात झालेल्या गडबडीत रश्मिकाचा संताप झाला असला तरी तिचा संयम कायमच होता. (rashmika mandanna gets trolled after refusing to click selfies video viral)


यावरूनही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये रश्मिका पांढऱ्या रंगाच्या शिमर पंजाबी ड्रेस (Rashmika Madanna in White Dress) घातला होता. यावेळी ती खूपच सुंदर दिसत असली तरी मात्र चाहत्यांच्या अचानक आलेल्या गर्दीनं तिचा एकच गोंधळ उडाला आणि तिही गडबडून, घाबरून गेली. सध्या तिच्या या व्हिडीओनं सेलिब्रेटींच्या मागे जास्त धावू नका असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहेत.


अनेकांसोबत तिनं सेल्फी घेण्यास नकार दिला परंतु या गर्दीमध्ये मात्र रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी एक लहान मुलगी तिथे आली आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी रश्मिका स्वत:हून पुढे आली व तिच्यासोबत वाकून सेल्फी घेतला परंतु यावरूनही रश्मिका ट्रोल झाली आहे. 


हेही वाचा - ''72 तास आहेत तुमच्याकडे'' लग्नाआधी Pregnant असल्याचं कळताच Neha Dhupia च्या आईवडिलांनी दिलेली 'अशी' प्रतिक्रिया


एकानं कमेंट केली आहे की, ''त्या लहान मुलीला मोठं झाल्यावर कळेल की हे सगळं की वेळ वाया घालवणार होतं.'' सेलिब्रेटींसोबत सेल्फी काढणं महत्त्वाचं नाही असं त्यानं लिहिलं आहे. तर अनेकांनी फार तिखट भाषेत रश्मिकाला ट्रोल केलं आहे. परंतु लेकी बोले सुने लागे त्याप्रमाणे नेटकऱ्यांनी थेट रश्मिकाचं नावं न घेता 'सेलिब्रेटी' हा शब्द वापरून तिच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली आहे. एका युझरनं सांगितले आहे की, ''या सेलिब्रेटींच्या मागे धावून एवढं सेल्फी घेणं, धावणं म्हत्त्वाचे आहे का?'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे की, ''मला अजूनही कळतं नाही या सेलिब्रेटीसोबत जर का सेल्फी घेतला नाही तर यांच्या आयुष्यात असा काय फरक पडतो?''


पाहा व्हिडीओ : 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रश्मिका आपल्या 'पुष्पा' (Pushpa 2) या चित्रपटासाठी आजही ओळखली जाते. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्ष होतील तरीही रश्मिकाचे फॅन फॉलोईंगही तेवढेच स्ट्रॉग आहे. मध्यंतरी आपण व्हेजिटेरियन आहोत असं सांगून रश्मिकानं 'चिकन बर्गर'ची (Rashmika Mandanna Chicken Burger Ad) जाहिरात केली होती. त्यावरून रश्मिका फारच ट्रोल झाली होती.