`मी आजही त्याला भेटते, पण...`, म्हणून Ex-Boyfriend ला विसरु शकत नाही रश्मिका
रश्मिकाच्या ज्या भावना आहेत, त्यांना प्रेम म्हणतात का? विभक्त झाल्यानंतरही म्हणते, `मी आजही त्याला भेटते, पण...`
मुंबई : 'पुष्पा: द राइज' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. रश्मिका लवकरच महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता स्टारर 'गुड बाय' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या यशासाठी अभिनेत्री जोरदार प्रमोशन करत आहे. महत्त्वाच म्हणजे अभिनेत्री फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. दरम्यान अभिनेत्री एका वक्तव्यामुळे तुफान चर्चेत आली आहे.
रश्मिकाने एका मुलाखती दरम्यान एक्स बॉयफ्रेंड्सबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी रश्मिकाला विचारलं, 'जेव्हा तू एक्स बॉयफ्रेंडच्या पार्टनरला भेटते तेव्हा त्यांना काय म्हणते, 'हाय की गुडबाय?'' या प्रश्नावर अभिनेत्रीने लक्ष वेधून घेणारं उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, 'माझं अद्यापही माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मैत्रीचं नातं आहे. कदाचित ही चांगली सवय नाही, पण त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. तर हे चांगलं आहे...' त्यामुळे रश्मिका प्रेमापेक्षा अधिक मैत्रीला जास्त महत्त्व देते हे याठिकाणी दिसून येतं.
रश्मिका आणि रक्षित यांचा साखरपुडा
पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदाना ही खूप ओपन माइंडेड असणारी अभिनेत्री आहे. किरिक पार्टीच्यावेळी मंदानाने तिचा सहकलाकार रक्षित शेट्टीला डेट करण्यास सुरुवात केली आणि 3 जुलै 2017 रोजी तिच्या मूळ गावी विराजपेट येथे एका खाजगी समारंभात या कपलने साखरपूडा केला होता. मात्र, या कपलने सप्टेंबर 2018 मध्ये कॉम्पिटेबल इश्यूचं कारण देत हा साखरपूडा मोडला.