`लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र...`, Deepika Padokone च्या बिकिनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बिकिनी वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी बिकीनी वादात उडी घेतली आहे.
Ratna Pathak on Bikini Controversy: आजपर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता अभिनेता शहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'पठाण' सिनेमा मोठ्या अडचणीत सापडला आहे. 'पठाण' (Pathaan) सिनेमात बेशरम रंग (Beshram rang) गाण्यात दीपिकाने घातलेल्या बीकिनीमुळे अभिनेत्री सर्वत्र ट्रोल होत आहे. वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी बिकीनी वादात उडी घेतली आहे.
एका मुलाखतीत रत्ना पाठक म्हणाल्या, 'लोकांकडे खायला अन्न नाही, पण वाद करायला मात्र विसरत नाहीत. एक कलाकार कोणते आणि कोणत्या रंगाचे कपडे घालतो... याचा कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नसतो. पण सध्या कलाकारांचे कपडे राष्ट्रीय विषय म्हणून नवं वळण घेताना दिसत आहे.' Ratna Pathak on Bikini Controversy
वाचा | 'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेचा अपघात; फोटो समोर
रत्ना पाठक पुढे म्हणाल्या, 'हा मुद्दा चर्चा करण्यासारखा नाही आणि मी याला जास्त महत्त्व देखील देणार नाही. या विषयावर मला अधिक बोलण्याची इच्छा देखील होत नाही. जे लोक याप्रकरणामध्ये सक्रिय दिसत आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त संवेदनशील लोक या जगात आहेत. ते लवकरच या प्रकरणावर बोलतील' (ratna pathak shah)
'सध्या जे काही होत आहे, ती भीतीची भावना आहे, बहिष्काराची भावना आहे... अशी भावना फार काळ टिकू शकत नाही. एक काळ येईल या सगळ्या गोष्टी अंत होईल आणि मी त्याच क्षणाची प्रतीक्षा करत आहे..' असं देखील रत्ना पाठक म्हणाल्या.
'काही वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्री निशाण्यावर आहे. अनेक सिनेमांच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरली. पठान सिनेमाचं गाणं देखील या धक्कादायक परिस्थितीचा सामना करत आहे.' असं देखील ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक म्हणाल्या.
दरम्यान पठाण (Pathaan) सिनेमातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालणे दीपिकाला चांगलंच महागात पडलं. यावर भाजपसह अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. (ratna pathak husband)
भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.त्यामुळे आता हा वाद कुठे शमतो, हे पाहावे लागणार आहे. (naseeruddin shah wife)