मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक लवकरचं 'हम दो हमारे दो' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  'हम दो हमारे दो' चित्रपटामध्ये रत्ना पाठक अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि परेश रावल (Paresh Rawal) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात रत्ना अभिनेते परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासंबंधी बोलताना रत्ना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्ना पाठक आणि  नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)  यांच्या नात्याला 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. रत्ना पाठक यांनी पती नसीरुद्दीनसोबतच्या नातेसंबंधाचे वर्णन त्यांच्या पहिल्या 'संभोग से संन्यास तक' या नाटकाप्रमाणे केले. रत्ना पाठक यांनी बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाहसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. एका नाटकादरम्यान आमची भेट झाल्याचे त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. 'संभोग से संन्यास तक' हे आमचे पहिले नाटक होते.


आम्ही चांगले मित्र..
रत्ना हसला म्हणाल्या,  त्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत आणि आता असं वाटतंय की आमची कथा 'संभोग ते संन्यास तक' सारखीच आहे. नसीरुद्दीनसोबतच्या त्यांच्या सुंदर बॉन्डिंगबद्दल त्या म्हणाल्या की आम्ही चांगले मित्र झालो आणि नेहमीच चांगले मित्र राहिलो.


नसीरुद्दीन फार मेहनती आहेत
यावेळी रत्नी यांनी असेही सांगितले की नसीरुद्दीन खूप मेहनती आहेत आणि हीच गोष्ट त्यांना आणखी चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. रत्ना यांनी कबूल केले की त्या आळशी आहेत आणि मेहनती नाहीत. सध्या त्यांचं हे वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे. 


यावेळी रत्ना यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दलही चर्चा केली. त्यांनी सांगितले की हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो सर्वांना भुरळ पाडणारा आहे. अभिषेक जैन दिग्दर्शित 'हम दो हमारे दो' या चित्रपटात रत्नीच यांची जोडी परेश रावल यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटात राज कुमार राव आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत, या दोघांसोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी त्या खूप उत्सुक आहे.