Raveena Tandon कुटुंबात येणार वादळ, भावाच्या पहिल्या पत्नीने घेतला मोठ निर्णय
इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा सर्वत्र रंगत असते. रविनाच्या मात्र...
मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा सर्वत्र रंगत असते. कधी कोणाचं सुत कोणसोबत जुळेल सांगता येत नाही. आता चर्चा रंगत आहे, ती म्हणजे अभिनेत्री रविना टंडनच्या कुटुंबाची. रवीना टंडनच्या भावाची पहिली पत्नी आणि अभिनेत्री राखी विजन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. राखी विजन पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री राखी विजनला लोकप्रिय टीव्ही शो 'हम पांच'मध्ये साकारलेल्या 'स्वीटी' या भूमिकेसाठी ओळखलं जातं. स्वीटीच्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी राखी आजही टीव्ही विश्वात आघाडीवर आहे.
रवीना टंडनच्या भावासोबत घटस्फोट झाल्यानंतर ती सिंगल लाइफ एन्जॉय करत होती. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्री वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही मोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे.
राखी लवकरचं बॉयफ्रेंड फरीद कराचीवालासोबत लग्न करणार आहे. गेल्या 7 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाबद्दल राखी म्हणाली, 'एका कॉमन मित्राने आमची ओळख करून दिली. आम्हा दोघांचा भूतकाळ आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'आम्ही ठरवलं होतं की, जसं चाललंय, तसं ठिक आहे. लग्नाचा निर्णय नंतर घेऊ. पण आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.'
'गेल्या वर्षीच आम्ही लग्न करणार होतो. पण माझ्या वडिलांचं निधन झाल. म्हणून लग्न करता आलं नाही. आता आम्ही लग्न करणार आहोत.' महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर राखीने रविना टंडन आणि पहिल्या पतीसोबत संपर्कात नाही.