Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती आणि तिचं चर्चेत येण्याचं कारण तिच्या ड्रायव्हरनं काही लोकांना धडक दिल्याचा आरोप होता. दरम्यान, जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आणि पोलिसांनी तपास केला तेव्हा एक गोष्ट समोर आली की रवीना टंडनची किंवा तिच्या ड्रायव्हरची काहीही चूक नाही. दरम्यान, रवीना टंडननं तिची इमेज खराब करण्याचा आरोप करत त्या एका व्यक्तीवर 100 कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे. हे प्रकरण त्याच व्यक्तीशी जोडलेलं आहे ज्यानं रवीनाचा एक व्हिडीओ शेअर करत दावा केला होता की तिच्या गाडीनं त्या व्यक्तीच्या आईला धडक दिली. याशिवाय त्यावेळी रवीना ही नशेत असल्याचा दावा देखील त्यानं केला होता. रवीनावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे ठरल्यानंतर आता तिनं त्याच्यावर मानहानिचा दावा ठोकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीना टंडनवर लगावण्यात आलेल्या या आरोपांनंतर तिनं त्याच्या विरोधात अपमानास्पद कॉन्टेट पसरवण्याविषयी आरोप केला आहे. या व्यक्तीला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिनं 100 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. ही नोटिस रवीनानं त्या व्यक्तीला 12 जून रोजी पाठवली होती. रवीनाची वकील सना रईस खाननं इंडिया टुडेला याविषयी माहिती देत सांगितलं की काही दिवसांपासून रवीनाला एक खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट झालं आणि मग तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. तर त्यांनी म्हटलं की पत्रकार असण्याचा दावा करणाऱ्या एका घटनेविषयी आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून चुकीची माहिती दिली.  



हेही वाचा : लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं 'हे' गाणं; शूटसाठी आला तब्बल 1 कोटींचा खर्च


रवीनाच्या वकीनं हे देखील सांगितलं की अभिनेत्रीविषयी खोटी बातमी पसरवणात रवीनाची प्रतिमा खराब करण्याचा मुद्दामून प्रयत्न करण्यात आल्याचा दिसतंय. त्यांनी आरोप करत म्हटलं होतं की या खोट्या बातम्या पसरवण्याच्या मागे जबरदस्ती पैसे उकरनं होतं. त्यासोबत रवीनाच्या नावावर लोकप्रियता मिळवणं देखील होतं. तिनं सांगितलं की या प्रकरणात त्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करत आहोत. दरम्यान, अजून या सगळ्यावर त्या व्यक्तीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.