Raveena Tandon Rekha War : बॉलिवूडमध्ये (Bollywood Affairs) काही अफेयर्स फार गाजले. एक काळ होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याचा अफेयर (salman khan-aishwarya rai bachchan affair) बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय होता. मात्र दोघांमध्ये असं काही खटकलं की, दोघे आयुष्यात परत कधीच  एकत्र आले नाहीत. तुम्हाला माहित आहे बॉलिवूडमध्येआणखीही एक कपल होत ज्यांच्या अफेयर काय,लग्नाच्या चर्चांनी खूप फुटेज खाल्लं होत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण आता ज्या कपलबद्दल बोलत आहोत ते कपल म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) . या दोघांचं नातं सुद्धा  सलमान ऐश्वर्या यांच्या लव्ह स्टोरीप्रमाणे गाजलेलं असं होत. त्यांच्याही लव्हस्टोरीचा डी एन्ड फार काही चांगला राहिला नाही.


1994 साली प्रदर्शित झालेल्या मोहरा (blockbuster mohara hindi movie) या सिनेमातून रवीना आणि अक्षय कुमार यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात (raveena tandon akshay kumar love affair) झालं.  खरतर हा सिनेमा दोघांसाठी फार खास राहिला कारण , हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्याचसोबत अक्षय आणि रवीनला खूप मोठा ब्रेक मिळाला. इंडस्ट्रीमध्ये नवी ओळख मिळाली.


मोहरा नंतर ही जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडू लागली. दोघांनी एकत्र अनेक सिनेमे केले. दोघांमध्ये सार काही आलबेल सुरु होत आणि तेवढ्यात पाल शिंकली असच म्हणावं लागेल कारण दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये तडा जायला सुरवात झाली. आणि याला जबाबदार होती सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा...


1996 मध्ये आलेल्या 'खिलाडियों का खिलाडी' (khiladiyon ka khiladi) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखाची जवळीक वाढू लागली (Rekha-akshay kumar affair) आणि लवकरच, अक्षय आणि रेखाचा रोमान्सच्या चर्चा  इंडस्ट्रीत पसरू लागल्या, ज्यामुळे रवीनाला खूप असुरक्षित वाटू लागले.


रवीनाच्या म्हणण्यानुसार, अक्षय रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे माहित असूनही रेखा अक्षयसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. Rediff.com ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'मला वाटत नाही की अक्षयचा रेखा यांच्याशी काही संबंध असेल. खरं तर, तो त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अक्षयनं रेखा यांना चित्रपटामुळे सहन केलं. एका वेळेनंतर रेखा यांनी अक्षयसाठी घरातून जेवणाचा डब्बा आणायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी हस्तक्षेप केला कारण या गोष्टी मर्यादेचा पलीकडे जात असल्याचे मला दिसले.'


सर्व प्रकार पाहिल्यानंतर रवीनाने रेखा याना गाठलं आणि अक्षयपासून दूर राहण्यास सांगितलं होत खरतर सांगितलं आहे असं म्हणण्यापेक्षा तशी ताकीदच दिली असं म्हणावं लागेल.


सिने ब्लिट्झला दिलेल्या दुसर्‍या एका मुलाखतीत रवीना म्हणते '' जर एखाद्या अभिनेत्रीला माहित आहे की, तो अभिनेता रिलेशनशिपमध्ये आहे तरी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे तर तिला मी बरोबर सरळ करेन. मुळात अक्षयला माहित आहे अश्या परिस्थिती काय आणि कसं रिऍक्ट व्हायचं.''


पण तरीही हे फार काळ चालू शकलं नाही आणि शेवटी तो दिवस आला ज्यावेळी दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. रेखाच प्रकरण संपतं  तोच, अक्षय आणि शिल्पा शेट्टीच्या अफेयरच्या (akshay kumar,shilpa shetty affair) चर्चा समोर आल्या आणि यावेळी मात्र रवीनाने अक्षयपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तो कायमचा. यानंतर दोघे कधीही एकत्र आले नाहीत. (Raveena Tandon warned rekha to keep distance from ex boyfriend akshay kumar know the war between actress)