पाकिस्तानमध्ये रिलीज नाही होणार सचिनचा चित्रपट, हे आहे कारण...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा चित्रपट `सचिन: अ बिलियन ड्रीम्स` भारतासह जगभरात रिलीज झाला असली तरी तो सध्या तरी पाकिस्तानात रिलीज होणार नाही. पाकिस्तान एग्झिबिटर भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाकिस्तानात दाखवू इच्छित आहे.
इस्लामाबाद : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा चित्रपट 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' भारतासह जगभरात रिलीज झाला असली तरी तो सध्या तरी पाकिस्तानात रिलीज होणार नाही. पाकिस्तान एग्झिबिटर भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाकिस्तानात दाखवू इच्छित आहे.
पाकिस्तान फिल्म एग्झीबिटर असोसिएशनचे अध्यक्ष जोरेज लशारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, बाहुबली आणि हाफ गर्लफ्रेंड हे चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. आम्हांला 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट पाकिस्तानात दाखवायचा आहे. पण या चित्रपटाने निर्णय सेन्सर बोर्डाने पास केल्यानंतर रिलीज होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
भारतीय चित्रपट पाकिस्तानात चांगला बिझनेस करतात, भारतातील जे पण चित्रपट प्रदर्शित केले जातात. दरम्यान, चित्रपट वितरक अनिल थंडानी म्हणाले की, पाकिस्तानात हा चित्रपट रिलीज होणार नाही. कारण या संदर्भात कोणीही चौकशी केली नाही. पाकिस्तानातून मागणी केली जाते, अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही.