मुंबई : बिग बॉस या रिएलिटी शोला भारताप्रमाणे जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. लवकरच भारतामध्ये बिग बॉसच्या 12 व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वामध्ये काही खास आकर्षण असतात.  बिग बॉसच्या 12 व्या पर्वाची अवघ्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेसोबत एक खास गोष्ट जाहीर करण्यात आली आहे.  


 बिग बॉसच्या 12 व्या पर्वाचं वैशिष्ट्य काय ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बिग बॉसच्या 12 व्या पर्वासाठी ऑडिशन सुरू होणार आहे. बिग बॉसच्या ऑडिशनमध्ये जोड्यांनी सहभाग घेता येणार आहे. बिग बॉसमध्ये ऑडिशन देण्यासाठी तुमच्यासोबत लाईफपार्टनर असणं अपेक्षित नाही तर तुम्ही कोणत्याही साथीदारासोबत ऑडिशन देऊ शकता.  


 यंदा रंगणार जोड्यांचा मामला  


 बिग बॉसचं प्रत्येक पर्व एका खास थीमवर आधारित असतं. त्यानुसार यंदाही बिग बॉसच्या 12 व्या पर्वासाठी गे किंवा लेस्बियन कपल्स अपेक्षित आहेत. हा फॉर्म्युला बिग बॉसच्या आगामी पर्वाला उत्तम टीआरपी मिळावा यासाठी करण्यात आला आहे. असेही सांगितले जात आहे.   


 टीआरपीमध्ये अव्वल  


 बिग बॉसच्या खेळामध्ये दरवर्षी काही खास थीम असते. सारा शो त्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे या शोच्या चाहत्यांना त्याची खास उत्सुकता असते. 
 बिग बॉसचं मागील पर्व टीआरपीच्या रेटिंगमध्ये अव्वलस्थानी होते.