मुंबई : बाहुबली सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत एक नवा विक्रम नोंदवला. अनेकांनी या सिनेमाला पसंती दिली. या सिनेमाने अनेकांचं मन जिंकलं. सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. पण आज आम्ही तुम्हाला अशा भूमिकेबद्दल सांगणार आहोत. जो खूप हँडसम आणि स्टायलिश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बाहुबली सिनेमामध्ये कटप्पाची भूमिका करणारा अभिनेता सत्यराज हे आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये याआधी काम केलं आहे. सत्यराज यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1954 ला तमिळनाडूमध्ये झाला होता. अभिनेता सोबतच ते दिग्दर्शक देखील आहे.



बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका केल्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. 1978 मध्ये त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तमिल सिनेमा 'सट्टम एन कईल' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. सत्यराज यांनी याआधी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 1986 मध्ये महेश्वरी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.