मुंबई :  बॉलिवूडमध्ये सध्या अर्जून कपूर आणि मलायका अरोराच्या प्रेमाची अगदी मोकळेपणाने चर्चा आहे. अनेक दिवसांपासून सगळ्यांपासून लपणारे हे दोघं आता अगदी सहज सगळ्यांसमोर वावरत आहे. पण त्यांच्या या प्रेमाने सगळेच खूष नाहीत. सलमान खानची या नात्याबद्दलची नाराजी सगळ्यांसमोर आहेच अस असताना अभिनेत्री सोनम कपूर देखील या नात्यामुळे नाखूष असल्याचं समोर आलं आहे. तिला अजिबात वाटत नाही की, मलायका अरोरा तिची वहिनी बनावी. महत्वाचं म्हणजे सोनम कपूर आणि मलायकामधील हा वाद अर्जून कपूरमुळे नाही तर या दोघींचा वाद अतिशय जुना आहे. एका पार्टीत या दोघींचा वाद झाला होता आणि अगदी तेव्हापासून या दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद डिझाइनर मनीष मल्होत्राच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत झाला होता. जो कार्यक्रम करण जोहरने होस्ट केला होता. 


असं कळलं की, या पार्टीत मलायकाने खूप ड्रिंक्स केलं होतं. यावेळी सोनमने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण उलट मलायकाच सोनम कपूरवर खूप भडकली आणि नको ते बोलली. हा हंगामा बघून करण आणि मनीषमध्ये आले. पण या दोघी तेव्हापासून एकमेकींशी बोलत नाहीत. सोनम कपूरच्या या निर्णयाने कपूर कुटुंबातच दोन ग्रुप बनले आहेत. जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांचा या लग्नाला पूर्वीपासूनच पाठिंबा आहेत. एवढंच काय तर अनिल कपूर यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त 24 डिसेंबर रोजी मलायका कपूर कुटुंबात सहभागी झाली होती.