`रेड` सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
बॉलिवूडचा `सिंघम` अजय देवगण आणि इलियाना डिक्रूजचा `रेड` सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच पसंतीस आल्याचे दिसतेय. समीक्षकांनीही याला चांगली रेटींग दिली आहे. सिनेमात अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका करतोय जो काळ्या पैशाच्या विरोधात असतो.
मुंबई : बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण आणि इलियाना डिक्रूजचा 'रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच पसंतीस आल्याचे दिसतेय. समीक्षकांनीही याला चांगली रेटींग दिली आहे. सिनेमात अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका करतोय जो काळ्या पैशाच्या विरोधात असतो.
१०.५० कोटींची कमाई
सिनेमा ट्रेंड अॅनालिस्ट रमेश बालाने शनिवारी आपल्य अधिकृत अकाऊंटवरून 'रेड' च्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. ऑफिसवर 'रेड' ने पहिल्याच दिवशी १०.५० कोटी रुपये कमाई केल्याचे त्याने म्हटलेय. याचसोबत २०१८ मधील मोठी सुरूवात करणारा दूसरा सिनेमा ठरला.
भंसालीच्या 'पद्मावत'ने २४ कोटी रुपयांची ओपनिंग केली होती.
४० कोटींचा आकडा पार
ट्रेंड दिग्गजांच्या अंदाजानुसार हा सिनेमा विकेंला ४० कोटींचा आकडा पार करेल. हा सिनेमा देशभरात ३४०० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आलाय.