मुंबई : अलिकडेच झालेल्या रील मूव्ही अवॉर्ड्स २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा सहभागी झाली होती. व्हाईट रंगाच्या गाऊनमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार रावने देखील पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ब्लॅक रंगाच्या शेरवानी तो उत्तम दिसत होता. राजकुमार रावचा नवा सिनेमा ओमर्टा लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि लवकरच तो मेंटल है क्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.अभिनेता जिम सरभने ही पूरस्कार सोहळ्यात आपली वर्णी लावली. जिम सरभला पद्मावत सिनेमाने ओळख निर्माण करून दिली.


अभिनेत्री दिया मिर्जाही या शोमध्ये उपस्थित होती. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील हा खास लूक. टी.व्ही. मालिका साराभाई वर्सेस साराभाई यातून ओळख निर्माण केलेली अभिनेत्री रतना पाठक याही सोहळ्यात उपस्थित होत्या. बरेली की बर्फीमध्ये झळकलेला अभिनेता पंकज त्रिपाठी ही सोहळ्यात सहभागी झाला होता.