सलमानच्या सिनेमातील `या` अभिनेत्रीने एक्टिंगसाठी सोडलं शिक्षण
बॉलिवूडमध्ये आईच्या भूमिकेत जर कोणी सर्वात फिट असेल तर त्या होत्या रीमा लागू.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आईच्या भूमिकेत जर कोणी सर्वात फिट असेल तर त्या होत्या रीमा लागू. मराठी अभिनेत्री रीमा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले. आज रीमा यांचा वाढदिवस आहे आणि यानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.
करिअरसाठी सोडलं शिक्षण
रीमा लागू यांचं खरं नाव नयन भडभडे होतं. त्यांचा जन्म 21 जून 1958ला झाला. त्यांची आई मंदाकिनी खडबडे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. शिक्षणादरम्यान रीमा यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. हायस्कूलनंतर त्यांनी व्यावसायिक अभिनयाला सुरुवात केली. रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली. बरीच वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं, त्यानंतर 1980मध्ये त्यांनी 'कलयुग' चित्रपटातून सह-अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
टिकू शकलं नाही लग्न
या दरम्यान त्यांची भेट लोकप्रिय मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाली. मराठी अभिनेता विवेक लागू यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी आपलं नाव रीमा लागू म्हणून स्वीकारलं. या दोघांनाही मृण्मयी लागू ही मुलगी आहे. लग्नानंतर थोडा काळ ठिक होता, सगळं काही ठीक होतं पण त्यानंतर रीमा लागू आणि विवेक यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाला की लग्नाच्या काही वर्षानंतर रीमा लागू पती विवेक लागूपासून विभक्त झाल्या.
'मैंने प्यार किया'नंतर मिळाली ओळख
पतीपासून विभक्त झाल्यानंतर रीमा लागू यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा संभाळ केला. चार दशकांच्या कारकिर्दीत रीमा यांनी अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्तसह अनेक बड्या अभिनेत्यांसोबत हिंदी चित्रपटांत आईची भूमिका साकारल्या. 'मैंने प्यार किया' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर रीमा यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमांत त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली. यानंतर रीमा यांनी अनेक सिनेमांत काम केलं.
बऱ्याचं मालिकेत केलं काम
रीमा लागू यांनी आपल्या करिअर मध्ये 95 पेक्षा जास्त सिनेमांशिवाय अनेक मालिकेत देखील काम केलं आहे. यामध्ये 'तू तू मैं मैं' आणि 'श्रीमान श्रीमती' या मालिका हिट झाल्या होत्या. तर संजय दत्तचा 'वास्तव' हा सिनेमा बराच हिट झाला. हा सिनेमा छोटा राजन यांच्या जीवनावर आधारित होता. या सिनेमांत रीमा लागू यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. ज्यात त्या आपल्या मुलाला गँगस्टर बनलेलं पाहतात आणि शेवटी आपल्याच मुलावर गोळी चालवतात. सिनेमातल्या या सीनवर रीमा लागू यांना बरीच मेहनत घ्यावी लागली होती. या सीन शूटदरम्यान त्यांच्या हातात असलेली रिवॉल्वर एवढी भारी होती कि, शूटिंगवेळी रीमा घामाने भिजून गेल्या होत्या. रीमा लागू यांनी त्यांच्या मृत्यूच्या दिवसा पर्यंत शूटींग केलं होतं. संध्याकाळी त्या जेव्हा शूटिंग संपवून घरी परतल्या आणि अर्ध्यारात्री त्यांच्या शातीत दुखू लागलं आणि त्यांचा मृत्यू झाला.