मुंबई : 'मैंने क्या किया', 'हम आपके हैं कौन', 'कल हो ना हो', 'साजन', 'पत्थर के फूल', 'हम साथ साथ हैं', 'दिलबर', 'यस बॉस', 'आरजू', 'किडनॅप' अशा अनेक सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी जिवंत आहेत. 2017 मध्ये रिमा लागू यांचं कोकीलाबेन रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांनी जगाचा निरोप घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजही रिमा लागू यांचे सिनेमे चाहते तितक्याचं आवडणे पाहतात. रिमा लागू यांच्याप्रमाणेचं त्यांची मुलही  मृण्मयी लागू देखील प्रचंड सुंदर आहे. रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मृण्मयी अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. 



मृण्मयी आईसोबतचे फोटोही पोस्ट करत असते. चाहत्यांनाही मृण्मयीचे फोटो खूप आवडतात. फोटोंवर कमेंट करून चाहते रिमा यांच्यासोबतच त्यांच्या मुलीचेही कौतुक करतात.


रिमा आणि मृण्मयी यांचे फोटो पाहिल्यानंतर चाहते 'क्या बात है कितना मजबूत बॉन्ड है' अशी प्रतिक्रिया देत आहेत. तर अन्य एक चाहता म्हणाला की 'साधेपणा असेल तर असे आहे.'


मृण्मयीने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.  'पीके', 'दंगल', '3 इडियट्स' आणि 'थप्पड' सिनेमांमध्ये काम केलं आहे. मृण्मयी टीव्ही आणि थिएटर अभिनेत्री असण्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट सुपरवायझर देखील आहे. ती मराठी, हिंदी सिनेमातील अभिनेत्रीही आहे,