Christopher Nolans Oppenheimer : ख्रिस्तोफर नोलानच्या दिग्दर्शनात साकारलेला कोणताही चित्रपट चाहत्यांसाठी परवणीच. दर्जेदार कलादिग्दर्शन, अफलातून पात्र आणि कलाकांची निवड, दमदार पार्श्वसंगीत आणि त्याहूनही विश्वासार्ह कथानक आणि दिग्दर्शन या त्याच्या चित्रपटातील जमेच्या बाजू. अशाच एका सत्य घटनेवर आधारित भाष्य करणाऱ्या कथानकाला नोलननं रुपेरी पडद्यावर आणलं असून, त्याचा 'ओपेनहायमर' हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. बॅटमॅन नाकारणाऱ्या किलियनला नोलनचा हा चित्रपट मिळणं, म्हणजे एखाद्या कलाकाराला परिसाचा स्पर्श होण्यासारखंच आहे. 


Batman ची भूमिका का नाकारली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

DC कॉमिक्सच्या बॅटमनवर अनेक चित्रपट आणि सिरीज आल्या. पण, सर्वात चर्चित ठरला तो ख्रिस्टोफर नोलानचा बॅटमन बिगिन्स. यात ख्रिश्चन बेलने साकारलेली सुपर हिरोची मुख्य भूमिका कुणालाच विसरता येणार नाही. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की त्या बॅटमनची भूमिका सध्या जगभरात चर्चेत असलेल्या किलियनला ऑफर करण्यात आली होती.


ख्रिस्टोफर नोलानच्या बॅटमन बिगिन्सच्या ऑडिशनसाठी सुरुवातीला किलियन मर्फीला बोलावण्यात आले होते. परंतु, आपली शरीरयष्टी कोणा सुपरहिरोसारखी नाही असं म्हणत त्यानं भूमिका सौम्य शब्दांत नाकारली. 


किलियननं ख्रिस्तोफरसारख्या बड्या दिग्दर्शकाला नकार दिला, तरीही तो त्याच्या सतत संपर्कात होता. एवढंच नव्हे, तर बॅटमन बिगिन्स आणि त्यावरील मूव्ही सिरीजमध्ये त्याने छोट्या भूमिकासुद्धा साकारल्या. ज्यानंतर थेट ओपेनहायमरच्याच भूमिकेसाठी नोलाननं त्याला निवडलं.


किलियन मर्फी, एमिली ब्लंट, फ्लोरेन्स फू, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, मॅट डेमॉन ( Cillian Murphy, Emily Blunt, Florence Pugh, Robert Downey Jr, Matt Damon) अशी तडगी स्टारकारस्ट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत म्हणजेच  J. Robert Oppenheimer यांच्या भूमिकेत दिसतोय अभिनेता किलियन मर्फी.


हेसुद्धा वाचा : भगवद् गीता अन् अणुबॉम्ब..; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?


 


अणुबॉम्बचा जनक, म्हणून संपूर्ण जगभरात ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या ओपेनहायमर यांची भूमिका साकारणं किलियनसाठी एक मोठं आव्हान होतं असंच म्हणावं लागेल. या भूमिकेसाठी त्यानं स्वत:चीची परीक्षाच घेतली. ज्याप्रमाणं प्रत्यक्ष आयुष्यात ओपेनहायमर यांचं भगवद् गीतेशी खास नातं होतं, अगदी त्याचप्रमाणं या भूमिकेसाठी किलियननंही गीता वाचली होती. एका मुलाखतीदरम्यानच त्यानं यासंबंधीची माहिती दिली. 


किलियनचं ट्रान्सफॉर्मेशन 


हुबेहूब  J. Robert Oppenheimer यांच्याप्रमाणं दिसण्यासाठी किलियननं स्वत:मध्येही बरेच बदल घडवून आणले. चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री एमिली ब्लंटनं त्याच्या डाएटबाबतची अशीच रंजक माहिती सर्वांसमोर आणली. एमिलीनं किलियनच्या डाएटवर प्रकाश टाकला. ओपेनहायमर यांच्यासारखी शररीयष्टी आणि त्यांच्यासारखाच चेहरा दिसावा यासाठी त्यानं अतिशय समर्पक वृत्तीनं खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केले. इतके की अनेकदा तो एका दिवसाला फक्त आणि फक्त एक बदामच खात असे. या साऱ्यामध्ये व्यायामावरही त्यांनं भर दिला होता. 


ओपेनहायमर यांची देहबोली साकारताना ती तंतोतंत असायलाच हवी यासाठी खुद्द किलियनही आग्रही होता. मार्टिनी आणि सिगरेटशिवाय क्षणभरही न राहणारे ओपेनहायमर साकारण्यासाठी किलियननं प्रचंड मेहनत घेतली. पण, त्याच्या या निर्णयाचा आरोग्यावर चांगला परिणाम झालाच असं नाही. किंबहुना असं कोणीही करू नका, हे त्यानं हल्लीच एका मुलाखतीदरम्यान स्पष्टही केली.