मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. 


रेखांचा पारंपारिक अंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी रेखा यांचा पारंपारिक अंदाज नेहमीप्रमाणे सर्वांनाच भावला. रेखा यांनी पिंक कलरची सिल्कची भरजरी साडी नेसली होती. त्यांचे दागिने आणि एकंदर अंदाज फारच लक्षवेधी होता. 
रिअॅलिटी शो ची जज शिल्पा शेट्टी हिने रेखाला ‘रेखा माँ’ असे संबोधले.



मुलांना प्रोत्साहन दिले


शोमधील सर्व मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. डान्सचा मंच असताना रेखाचा डान्स होणार नाही, हे शक्यच नाही. मग अमिताभ यांच्या 'रंग बरसे' या गाण्यावर त्या थिरकल्या.