मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. आयरा अभिनेत्री नसली तरी तिची चर्चा कायम रंगलेली असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या आयराच्या प्रत्येक पोस्टवर युजर्सची नजर असते. नुकताचं आयराने वडील आमिर खानसोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचे  काही फोटो पोस्ट केले. ज्यावर युजर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजर्सच्या कमेंटवर आयराने सडेतोड उत्तर दिलं आहे. एका युजरने आयराला विचारलं, 'ते तुझ्या इतक्या जवळ का उभे आहेत? तुझं त्यांच्यासोबत नातं काय आहे?' यावर अन्य युजर म्हणाला, 'लेक आणि वडिलांचं नातं आहे.' यावर एका युजरने उत्तर दिले की, 'हो, ही आमिर खानची मुलगी आहे. सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगल करू शकता.'



यानंतर एका यूजरने लिहिले की, 'गुगलही खोटं देखील बोलू शकतं. आपण किती वेळा काहीतरी शोधतो आणि काहीही उत्तर येतं.' वडिलांसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर येणाऱ्या कमेंट्स पाहून आयराने युजर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'हे नवीन आहे... पण हो गुगलवर असलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू नका...'


याआधी आयराने तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये आयरा तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसली. आयराचा हा फोटोही खूप व्हायरल झाला होता. आता आयरा वडील आमिर खानसोबत शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.