मुंबई : पलक तिवारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी मुलगी आहे. पलक तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिगरसाठी ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियावर अभिनेत्री सक्रिय असते.  पलक तिवारी सध्या सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत अनेकदा स्पॉट होताना दिसत आहे. मागच्या वर्षीही दोघं एकत्र दिसले होते पण पलक तिवारीने त्यावेळी चेहरा लपवला होता. मात्र यावेळी पलक तिवारीने आपला चेहरा लपवला नाही. तर  यावेळी ती उघडपणे मीडियासमोर आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये दोन्ही स्टार्स एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहेत. पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. या दोघांच्या जोडीचं खूप कौतुक झालं आहे. इब्राहिम अली खानने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही. पण बातम्या समोर येत आहेत की लवकरच इब्राहिम अली खान चित्रपटात डब्ल्यू करू शकतो.



इब्राहिम-पलकचं अफेअर 
पलक आणि इब्राहिम हे गेल्या वर्षीही एकत्र दिसले होते. ज्यामध्ये अभिनेत्री पलक इब्राहिमच्या कारमध्ये दिसली होती. मात्र मीडियाचा कॅमेरा तिच्यावर येताच तिने चेहरा लपवला. यानंतर पलक आणि इब्राहिम बरेच ट्रेलही झाले होते. मात्र या दोघांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.