Sonu Nigam ते Sunidhi Chauhan लहानपणी कसं गाणं गात होते पाहा व्हीडीओ
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गायक आहेत
मुंबई : बॉलिवूडमध्ये गायकांची कमी नाही. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गायक आहेत. पण ते एका रात्रीत स्टार बनले नाहीत तर त्यांनी बालपणापासूनच परिश्रम केल्यामुळे नशिब बदललं. आज आम्ही तुम्हाला काही गायकांच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे सांगणार आहोत.
सोनू निगम
90च्या दशकात या गायकाने तरुणांना हृद्ययात कशी फलींग तयार करायची हे शिकवलं. पण बालपणापासूनच त्याने गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कठोर परिश्रमांवर मात करत सोनू निगम यशाच्या शिकरावर पोहचला.
सुनिधी चौहान
इंडस्ट्रीमधील एक सर्वोत्कृष्ट महिला गायिका, तिच्या दमदार आवाज आणि उच्च सुरांबद्दल आम्ही काय बोलू. सुनिधी 'मस्त'च्या गाण्यानंतर ईतकी प्रसिद्ध झाली की, आजही तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला होतं.
श्रेया घोषाल
'जिस्म सिनेमातून पदार्पण करणार्या व पहिल्याच गाण्याने लोकांना वेड लावणाऱ्या श्रेया घोषालने. यानंतर बाद डोला रे डोला ते लेकर ये इश्क हाये पर्यंत प्रत्येक वेळी तिच्या आवाजाची जादू चाहत्यांवर केली आहे. श्रेयाने बालपणात रिएलिटी शोमध्येही भाग घेतला होता.
आदित्य नारायण
उदित नारायण यांचा लाडका मुलगा आदित्य नारायण याला गाण्याची खूप आवड होती. आणि त्याने काही चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाजही दिला आहे. 'बीवी नंबर वन' चित्रपटात बाल आवाजातील गाणं आदित्यच्या आवाजात होतं, तर रणवीर सिंगवर चित्रीत केलेलं तत्तड़ तत्तड़ या गाण्याने धुमाकूळ घातला होता.
नेहा कक्कर
आज इंडस्ट्रीमध्ये अव्वल गायिका बनणारी नेहा कक्कर लहानपणापासूनच आपल्या मोठ्या बहिणीबरोबर गाणं गायची. यानंतर तिने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला पण ती त्या शोमधून लगेच बाहेर पडली होती. काही वर्षानंतर पण ती ज्या शोमधून बाहेर पडली त्याचं शोमची ती जज झाली.
अरिजित सिंग
गायक अरिजीत सिंग देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. ज्याने बऱ्यांच सिनेमांची शिर्षक गीत म्हटली आहेत. त्याने आपल्या करिअरला फेम गुरुकुल या रिअॅलिटीमधून सुरुवात केली. आणि तिथूनच त्याचे लाखो चाहते झाले.