Maharashtrachi Hasyajatra Remo D'Souza : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो (Comedy Show) म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra). या शोमध्ये असलेले सगळेच कलाकार हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या स्किटमध्ये असलेले एक-एक विनोद हे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. काही दिवसांपूर्वी शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी व्हिडीओत आपल्याला समीर चौगुले (Samir Choughule), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), शिवाली परब (Shivali Parab), नम्रता संभेराव (Namrata Sambherav) व प्रियदर्शनी (Priyadarshani) या कलाकारांची मुख्य भूमिका आहे. हे कलाकार नाहीत तर बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझा दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेमो डिसूजाचा (Remo D'Souza) हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्राची त्यागीनं शेअर केला आहे. रेमो डिसूजासोबत त्याचे काही मित्र यावर अभिनय करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे रेमो देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'चा चाहता आहे असे म्हटले जात आहे. रेमोला मराठी शोचे वेड असल्याचे पाहता मराठमोळ्या प्रेक्षकांना आनंद झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खरंतर, हास्यजत्रेतील कोहली कुटुंब हे प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेलं आहे. (Maharashtrachi Hasyajatra kohli family) कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव हे हटके आहे. कुटुंबातील सदस्यांची भन्नाट नावं ऐकली तरी कोणाला हसू अनावर होत नाही. कुटुंबातील सदस्य हे त्यांची नाव सांगत असतात त्यांचे डायलॉग सुरु असताना बॅग्राऊंडवला म्युझिक देत एका तरुणानं अजब गाणं तयार केलं आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या नावात ली हे अक्षर आहेच. कोणत्याही गोष्टीविषयी बोलताना ते ली हा शब्द वापरतात. यामुळे सगळा गोंधळ होतो. 


हेही वाचा : चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...


दरम्यान, हे ट्रेंड सगळ्यात आधी यशराज मुखातेनं (Yashraj Mukhate) सुरु केला होता. यशराज डायलॉग्सवरून गाणी बनवू लागला आणि मग हा ट्रेंड सुरु झाला आहे. यशराजने या आधी तयार केलेलं पावरी साँग चांगलंच ट्रेंड झालं. तसचं बिग बॉस फेम शेहनाज गीलच्या (shehnaaz gill) एका संवादावर त्यानं तयार केललेलं 'तुम्हारी फिलिंग तुम्हारी' हे गाणही सोशल मीडियावर गाजलं.