मुंबई : 'ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस? उचलली जीभ लावली टाळ्याला... अशा शब्दांत सिने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही अभिनेत्री कंगना राणौतचे वाभाडे काढलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौतने मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचे वक्तव्य केले होते.  काही दिवसांपूर्वी कंगना राणौत हिने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. तुम्हाला मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. (ऊर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणौतला चांगलेच खडसावले) 



कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्यावर आता टिकेची झोड पडत आहे. बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतूनही कंगनाला सडेतोड उत्तर मिळत आहे. मुंबईला 'स्वप्ननगरी' म्हणतात. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करायला मुंबई मदत करत असते. एका तासाच्या फरकाने रेणुका शहाणे यांनी दुसरं ट्विट देखील केलं आहे. (मुंबईला POK म्हणणारी कंगना पुन्हा चवताळली, टीका करणाऱ्यांवर पलटवार) 


 



यामध्ये त्यांनी म्हटलंय,'माझ्यासकट सर्वच सरकारवर टीका करत असतो. पण "मुंबईत तुला पीओके सारखं का वाटत आहे?". मुंबई आणि पीओके यांच्यात थेट तुलना. तु केलेल्या तुलनेला काही अर्थ नाही. मुंबईकर म्हणून मला ही गोष्ट पटलेली नाही. तुझ्याकडून आणखी काही चांगल्याची अपेक्षा करणंच कदाचित चुकीचं आहे.'



या मुंबईत काम करूनच आपली ओळख निर्माण करणाऱ्या कंगनावर सध्या सर्वच बाजूंनी टीका होत आहे. ट्विटरवरून देखील तिला यावरून युझर्सचे प्रत्युत्तर मिळत आहे.