अभिनेता दर्शनला अखेर जामीन! रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, काय होतं हे प्रकरण?
Renukaswamy Murder Case Darshan Gets Interim Bail : रेणुकास्वामी प्रकरणात दर्शनला अंतरिम जामीन मंजूर
Renukaswamy Murder Case Darshan Gets Interim Bail : कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री पवित्रा गौडा हे जून महिन्यात चाहत्याच्या हत्ये प्रकरणात अडकले होते. खरंतर ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. या प्रकरणात दर्शनला अंतरिम जामीन मिळाला आहे. हा जामीन त्याला वैद्यकीय आधारावर मिळाला आहे.
खरंतर दर्शननं अंतरिम जामीन मिळावी म्हणून न्यायालता धाव घेतली होती. दर्शनने मणक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव ही अंतरिम जामीनाची याचिका केली होती. दर्शनचा हा अंतरिम जामीन न्यायमूर्ती एस विश्वजीथ शेट्टी यांच्या एकल खंडपीठाने मंजूर केला आहे. दरम्यान, दर्शन आतापर्यंत बल्लारी तुरुंगात कैद होता. तर त्याचे वकील नागेश यांनी याचिकेत म्हटलं होतं की त्याचे दोन्ही पाय हे सुन्न झाल्याचे म्हटलं त्यामुळे त्याला सर्जरीची आवश्यकता असल्यानं एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यासाठी अनुमती देण्याची परवानगी दिली. त्याशिवाय या सर्जरीचा जो काही खर्च असेल तो खर्च स्वत: दर्शन करणार आहे. या आधी सत्र न्यायालय 21 सप्टेंबरला जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीनसाठी अर्ज केला होता.
कशी केली हत्या?
दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्यासोबत एकूण 17 जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांनी मिळून ज्या चाहत्याचे निधन केले त्याचे नाव रेणुकास्वामी होते. या 33 वर्षीत तरुणाची हत्या करण्याआधी त्यांनी त्याचा एक फोटो काढल्याचे म्हटले गेले. इतकंच नाही तर रेणुकास्वामीला त्यांनी आधी विवस्त्र करून मारहाण केली त्यानंतर तो सतत त्याला सोडून द्या अशी विननवी करत होता. रेणुकास्वामी हा एक रिक्षाचालक होता. रेणुकास्वामीच्या शरीरावर 39 जखमा होत्या. याशिवाय दर्शन आणि त्याच्या मित्रांनी त्याला विजेचा झटका देण्यासाठी एक उपकरण आल्याचे देखील म्हटले जाते. दर्शन आणि त्याचे मित्रांनी रेणुकास्वामीला सतत मारहाण केली आणि त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध व्हायचा तेव्हा त्याच्या गुप्तांगाला विजेचा झटका दिला जायचा. या सगळ्या घटनेनंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.