मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या रोको सेरेमनीनंतर आता हे दोघं जोधपुरमधील राज उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. लग्नाची सगळीच तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 आणि 2 डिसेंबरला असणाऱ्या या शाही सोहळ्याकरता अमेरिकेहून निकचं संपूर्ण कुटुंब भारतात पोहोचलं आहे. निक आणि प्रियंकाच्या लग्नाची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हे दोघं लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना खास गिफ्ट देणार आहेत. सध्या या गिफ्टची जोरदार चर्चा रंगली आहे. 



प्रियंका - निक लग्नात सहभागी होणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना चांदीच नाणं देणार आहेत. या नाण्याचं वेगळेपण म्हणजे एका बाजूला NP म्हणजे निक आणि प्रियंकाच्या नावाचं आद्याक्षर आणि दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मी देवीचा फोटो असणार आहे. हे नाणं मुंबईतील एका लोकप्रिय ज्वेलर्से डिझाइन केलं आहे. 


प्रियांका आणि निक यांचा विवाहसोहळा जोधपूरला होणार असला तरीही तिच्या मुंबईच्या घरीही भलताच उत्साह पाहायला मिळत आहे. 


या जोडीचा साखरपुडा समारंभ पार पडला तेथेच प्रियांकाच्या जुहू येथील घराला सुरेख रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीला करण्यात आलेली ही सजावट पाहता बी- टाऊनमध्ये आणखी एका विवाहसोहळ्याची चर्चा होणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे.