Sushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!
Rhea Chakraborty on mental health : प्रसिद्धी आणि पैसा ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अनेकांचा मानसिक आरोग्याचा गैरसमज झालाय, असं रिया चक्रवर्ती म्हणते.
Rhea Chakraborty On Trolling : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप केले. रिया चक्रवर्ती हिला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही आली. रिया चक्रवर्तीला यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अशातच एका मुलाखतीत रिया चक्रवतीने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर रोखठोक वक्तव्य केलंय.
काय म्हणाली रिया?
सत्य हे आहे की या देशात मानसिक आरोग्य अजिबात समजलं जात नाही. आम्ही प्रगती करत आहोत. मला आनंद आहे की, तरुण लोक आता याबद्दल बोलत आहेत. भारत पुढं जात आहे, पण जर कोणी प्रसिद्ध असेल आणि त्याची मानसिक स्थिती असेल तर त्यांना ते समजत नाही. 'त्याला प्रसिद्धी आहे, त्याला यश आहे. तो उदास का आहे?', असं लोक विचारतात.
वस्तुस्थिती अशी आहे की, लोक आयुष्यभर काम करत असतात, कशासाठी धडपडत असतात? फक्त दोन गोष्टी... एक म्हणजे प्रसिद्धी आणि पैसा... म्हणून, जेव्हा ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. मानसिक आरोग्याचा गैरसमज झाला आहे, त्यामुळे श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती मानसिकदृष्ट्या प्रभावित किंवा नैराश्यात असू शकतं हे सत्य पचवणं लोकांना जड जातं, असं स्पष्ट मत रिया चक्रवतीने मांडलं आहे.
पूर्वी वयाच्या 31 व्या वर्षी मला माझ्या आत 81 वर्षांची स्त्री असल्यासारखी वाटायची. कठीण काळात तुम्ही देवदास होऊ शकता किंवा थेरपीची मदत घेऊन पुढे जाऊ शकता. मी थेरपीचा अवलंब केला अन् आयुष्यात पुढे गेले, असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमध्ये तिची काही भूमिका होती का? या प्रश्नावर, अभिनेत्रीने उत्तर दिलं... जेव्हा ती लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा असे वाटते की काही लोक तिच्याकडे पाहत आहेत जणू तिने काहीतरी केले आहे. सुशांतने असं का केलं हे तिला माहीत नाही. पण तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे हे तिला माहीत आहे, असं रिया चक्रवती म्हणाली आहे.
आणखी वाचा - रणबीरनंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार
दरम्यान, रियाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती आणि तिने शो आणि चित्रपट दोन्हीमध्ये काम केले आहे. याआधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत होती. त्यानंतर या प्रकरणात तिची चौकशी देखील करण्यात आली होती. त्यावेळी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.