मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशी बातमी आहे की ती अब्जाधीश बिझनेसमेन निखिल कामथला डेट करत आहे, जो इंडियन फायनंशियल कंपनी 'जेरोधा'चा को-फाउंडर आहे. आजकाल, 'रोडीज' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारी रियाचं नाव यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सलमान खानचा भाऊ सोहेल खानची माजी पत्नी सीमाचा भाऊ बंटी सजदेह यांच्याशी जोडलं गेलं आहे. त्याचबरोबर निखिलने मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला डेट केल्याचं सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्ती दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड होती. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले होते आणि गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाला तुरुंगात जावं लागलं होतं. यावेळी त्यांना लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं. या घटनेनंतर तिचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं आहे.


आता पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे. असं म्हटलं जात आहे की,  सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती आता आयुष्यात पुढे गेली आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे. ती निखिल कामथसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रिया सध्या 31 वर्षांची आहे आणि निखिल 36 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे.


बिझनेसच्या दुनियेत निखील कामथ हे खूप मोठं नाव आहे. त्याने 8 हजार रुपये पगाराच्या नोकरीने करिअरला सुरुवात केली होती. मात्र जॉबसोबतच त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. जेव्हा नफा होवू लागला तेव्हा या क्षेत्रात माझे नशीब आजमावलं. त्यांनी त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत 'झिरोधा' ही कंपनी सुरू केली. ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे, जी शेअर बाजारातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यवहार करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. 


निखिलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तो अगदी लहान वयात अब्जाधीश झाला. त्याची आणि भाऊ नितीनची संयुक्त संपत्ती ३.४५ अब्ज डॉलर आहे. निखिलने आपल्या कमाईतील अर्धी रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कामथचा घटस्फोट झाला आहे. त्‍याने 2019 मध्‍ये इटलीमध्‍ये अमांडा पूरवंकाराशी विवाह केला, जी देशातील एका मोठ्या हाऊसिंग ब्रँडची मालक आहे. निखिल आणि अमांडाचे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला.