मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (sushant singh rajput) निधनाने चाहत्यांना धक्का बसला असतानाच बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (rhea chakraborty) आयुष्यात अचानक भूकंप आला. सुशांतने हे जग सोडले तेव्हा तो रियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर रिया सतत चर्चेत होती. तिच्यावर अनेकांनी टीका ही केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतच्या कुटुंबीयांनी देखील रियावर आरोप केले. सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान रियाला बराच काळ तुरुंगात काढावा लागला. आता बिग बॉस 15 च्या संदर्भात रिया चक्रवर्ती हेडलाईन्समध्ये आहे.


बऱ्याच दिवसांपासून ही बातमी चर्चेत आहे की रिया चक्रवर्ती बिग बॉस 15 मध्ये दिसू शकते. निर्मात्यांनी रियाला शोसाठी ऑफर केल्याचे वृत्त आहे. रिया चक्रवर्ती सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 15 चा एक भाग असू शकते. पण याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


झूमच्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वी रिया अंधेरीच्या एका स्टुडिओमध्ये दिसली. बिग बॉस 15 चे स्पर्धक देखील येथे उपस्थित आहेत. तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली होती. असा दावा केला जातोय की रिया शोचा एक भाग आहे आणि ती प्रीमियरच्या रात्री परफॉर्म करताना दिसेल.


आता ईटाइम्सच्या नवीन अहवालांनुसार, अभिनेत्रीला निर्मात्यांनी दर आठवड्याला 35 लाख रुपये देऊ केले आहेत. अशा स्थितीत आता असे म्हटले जात आहे की अभिनेत्रीनेही आज सकाळी ऑफर नाकारली आहे. अर्थात, रिया चक्रवर्ती या वर्षी बिग बॉसचा भाग होणार नाही.


रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्ती आजकाल तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी बॉलिवूड दिग्दर्शकांना भेटत आहे. याच कारणाने कदाचित अभिनेत्रीने बिग बॉसपासून स्वतःला दूर केले आहे.


सुशांत प्रकरणाच्या तपासात सीबीआय, ईडी आणि एनसीबी एकत्र रियाची चौकशी करत होते आणि अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.


बिग बॉस 15 शो 2 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. दरवर्षी प्रमाणे, यावेळी देखील बिग बॉस मध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी, जे बिग बॉस ओटीटीचे प्रथम आणि द्वितीय उपविजेते होते, या शोमध्ये दिसतील. याशिवाय टीव्ही अभिनेत्री डोनल बिश्त आणि बिग बॉस 13 फेम असीम रियाज यांचा मोठा भाऊ उमर रियाज देखील या हंगामात सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल. याशिवाय बिग बॉस ओटीटीमध्ये धडक मारणाऱ्या प्रतीक सहजपालचे नावही आहे.