मुंबई : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने रियाची तब्बल आठ तास चौकशी केली. याचदरम्यान ईडीने रियाकडे असलेल्या संपत्तीबाबत चौकशी केली. शिवाय सुशांतबद्दल देखील चौकशी केली. शिवाय सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा सुशांतची संपत्ती म्हणून माझ्याकडे फक्त त्याने लिहिलेली  ‘कृतज्ञता यादी’ आणि  ‘छिछोरे’ असं नाव लिहिलेली त्याची पाण्याची बाटली असल्याचं तिने सांगितलं. सुशांतने लिहिलेल्या ‘कृतज्ञता यादी’ यादीमध्ये रियाच्या कुटुंबीयांची नावं आहे. 



सुशांतने लिहिलेल्या ‘कृतज्ञता यादी’यादीमधील लिल्लू म्हणजे माझा भाऊ शौविक, बेबू म्हणजे मी, सर म्हणजे माझे बाबा, मॅडम म्हणजे माझी आई आणि फज त्याचा कुत्रा असल्याचा खुलासा रियाने केला आहे. मात्र महत्त्वाची गोष्टी  हे सुशांतने कधी लिहलं तो दिवस अद्याप कळालेलं नाही. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने  १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.