Drug Case : Rhea Chakraborty च्या भावाला शौविकला मिळाला जामीन
ऑक्टोबरमध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणी अटक
मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) ला बुधवारी मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला आहे. शौविक चक्रवर्तीला सप्टेंबरमध्ये ड्रग्सच्या संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणाशी जोडण्यात आलं आहे. या प्रकरणात शौविकची बहिणी रिया चक्रवर्तीला देखील अटक करण्यात आलं होतं. मात्र ऑक्टोबरमध्ये दिला जामीन मिळाला. त्यावेळी शौविकची याचिका फेटाळण्यात आली होती.
एनसीबीने शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला होता. रियाला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मिळाला होता. त्याचबरोबर कोर्टाने रियाला प्रत्येक १० दिवसानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासही सांगितले होते.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ईडी आणि एनसीबी वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. तर दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (आयआयएमएस) डॉक्टरांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळली होती. तपासाअंती सुशांतने फाशी घेतल्याचंच या डॉक्टरांनी म्हटलं होतं.