मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता संजय दत्तच्या संजू या बायोपिकने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. संजू नंतर आता या लोकप्रिय अभिनेत्रीवर बायोपिक बनवला जात आहे. साऊथची लोकप्रिय अभिनेत्री शकीलाच्या जीवनावर हा सिनेमा बनत असून यात ऋचा चड्ढा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी शकीलाच्या रुपातील ऋचा चड्ढाचा पहिला फोटो समोर आला. ४४ वर्षांच्या शकीलाचे जीवनात असे काय विशेष आहे की त्यावर सिनेमा बनवा? जाणून घेऊया...


# शकीला आजही साऊथ सिनेमांमध्ये सक्रीय आहे. मल्याळम, तमिळ, तेलगु आणि कन्नड सिनेमात तिने काम केले आहे.


# शकीलाने २० वर्षाची असताना सॉफ्ट पॉर्न फिल्म 'प्लेगर्ल' मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. सिनेमात शकीलाने साहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. चेन्नईत जन्मलेल्या शकीलाचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. त्यामुळे ती फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकली. त्याचबरोबर तिला शिक्षणात विशेष रसही नव्हता. गटांगळ्या खात तिने सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


# पण एक खास गोष्ट म्हणजे कॉन्वेंट शाळेत शिकल्यामुळे तिचे इंग्रजी खूप चांगले होते. लहानपणपासूनच तिला अभिनयाची आवड होती. शकीला, साऊथच्या सिल्क स्मिताला आदर्श मानत होती. साऊथच्या अडल्ट सिनेमात काम करणाऱ्या स्मिताच्या पावलावर पाऊल टाकत शकीलानेही अडल्ट सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती तिच्या ६ बहिण-भावंड आणि आईला सांभाळू शकेल.


# सिनेसृष्टीत खूप नाव कमावल्यावर तिने आपले आत्मचरित्र मल्याळम भाषेत लिहिले. या पुस्तकानुसार, खूप लहान वयातच एका व्यक्तीने शकीलावर बलात्कार केला होता. हे तिने तिच्या आईला सांगितल्यावर तिची आई म्हणाली की, त्याबदल्यात आपल्या कुटुंबाला पैसे मिळतील. यावतिरीक्त पैशांमुळे शकीलाच्या बहिणीने तिला धोका दिला होता.


# एका मुलाखतीत शकीलाने सांगितले की, माझ्या आईची कोणतीही चांगली आठवण माझ्याकडे नाही. तिने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही. याउलट तिनेच माझे आयुष्य बर्बाद केले. आत्मचरित्रानुसार, १७ वर्षांची असताना शकीला सेक्स वर्कर बनली होती. आणि घरात पैसा यावा म्हणून तिच्या आईने तिला हे काम करायला सांगितले होते. 


# त्याचबरोबर तिने हे ही सांगितले की, मी ड्रिंक करण्यासाठी महिलांची कंपनी शोधते. कारण पुरुष एक-दोन ड्रिंकनंतर सेक्सची डिमांड करतात. आणि म्हणूनच ते माझ्यासोबत ड्रिंक करायला बसतात. खूप कोती मानसिकता आहे त्यांची.



# माझ्याकडे सुंदर शरीराशिवाय काहीच नव्हते. अनेकदा काम करताना वाट्याला शोषणही आले. तर अनेकदा सिनेमात फ्रि काम केल्याचेही तिने सांगितले.


# सुमारे २० वर्षानंतर शकिला सिनेसृष्टीत लोकप्रिय झाली. त्यानंतर तिला बिग बजेट सिनेमे ऑफर होऊ लागले. मग तिने शकीला प्रॉडक्शन हे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले. तिचे अधिकतर सिनेमे हिट झाले. त्यामुळे तिच्या सिनेमांच्या आजूबाजूलाही कोणी निर्माता सिनेमा प्रदर्शित करण्यास घाबरत असे.


# शकीलाला गृहिणी म्हणून आयुष्य जगायचे होते. पण परिस्थितीपुढे हतबल होऊन तिने हा मार्ग स्वीकारला. आता ती अनाथ मुलांचे पालनपोषण करते.