Rinku Rajguru : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सहज मिळतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. अनेक लोक हे आज इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखले जातात. इतकंच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सेलिब्रिटींसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या सगळ्या अपडेट्स या सोशल मीडियावरून मिळतात. त्यामुळे सेलिब्रिटी देखील त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करताना दिसतात. अनेकदा आपण पाहतो की सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सगळ्या पोस्ट काढून टाकतात. अनेकदा त्यांच्या आयुष्यात काही घडलेलं असतं हे त्या मागचं कारण असतं किंवा मग त्यांचा आगामी प्रोजेक्ट... दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूनं देखील सोशल मीडियावरून तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकु राजगुरुनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे जवळपास सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यावर आता फक्त दोन पोस्ट उरल्या आहेत. त्या आधी रिंकुनं तिची फिटनेस जर्नी संबंधीत सगळ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. तिच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य झाले होते. त्यात अनेक तिचे ते व्हिडीओ पुन्हा पाहून स्वत: च्या फिटनेससाठी इन्स्पिरेशन घ्यायचे. मात्र, अचानक रिंकुनं असं का केलं हा प्रश्न आता तिच्या लाखो चाहत्यांना पडला आहे. 



हेही वाचा : लग्नाआधी प्रेग्नंट, गर्भपातासाठी मागितले 75 लाख; 'बाहुबली' फेम राम्यानं पाहिले इतके वाईट दिवस


रिंकुच्या अकाऊटवर आता दोन पोस्ट असून त्यात एक व्हिडीओ 2022 चा आहे. तर एक पोस्ट तिनं यंदाच्या वर्षी रक्षाबंधनच्या निमित्तानं केली होती ती आहे. रिंकुच्या या अकाऊंटवर 774K फॉलोवर्स आहेत. त्यात या अकाऊंटवरून रिंकू फक्त 25 लोकांना फॉलो करते. त्यात काही मराठी कलाकारांचा समावेश आहे. तिचे इतके चाहते असताना रिंकुनं तिच्या अकाऊंटवरून सगळ्या पोस्ट डिलीट का केल्या. त्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रश्न आहे की रिंकुचं अकाऊंट हे हॅक वगैरे झालं नाही ना? दरम्यान, असं असलं तरी देखील रिंकुनं हायलाईटमध्ये ठेवलेल्या तिच्या सगळ्या स्टोरी या आपल्याला पाहायला मिळत आहेत.