मुंबई : मराठीत बोललेलं कळत नाही का ? की इंग्रजीत सांगू ? असे डायलॉग्स आणि उत्तम अभिनयामुळे रसिकांच्या मनावर राज्य करणारी 'आर्ची'चं वेगळं रुप आपल्याला पाहायला मिळतंय. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू 'सैराट'मधून घरारात पोहोचली. जगभरातून तिचं कौतूक झालं.  त्यानंतर आपल्या सर्वसाधारण आयुष्यात पुन्हा गेलेली रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मासिक पाळी बद्दल जनजागृती करताना ती दिसत आहे. स्टे फ्रीच्या जाहीरातीत ती मासिक पाळी बद्दल खुलेपणाने बोलत आहे.


काय म्हणतेय 'आर्ची' ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वयात आलेल्या मुलांच प्रेम आणि जातीमुळे त्याला होणारा अडसर अशी कहाणी आपण 'सैराट'मध्ये पाहिली. पण वयात आलेल्या मुलीला मासिक पाळी दरम्यान काय अडचणी येतात ? तिच्या मनात याविषयी काय समज गैरसमज असतात ? याबद्दल आर्ची आपल्याला सांगत आहे. 
ज्या विषयावर आपल्याकडे खुलपणानेच काय घरातही बोलणं टाळलं जातं, अशा मासिक पाळीबद्दल रिंकू समजावून सांगत आहे.


व्हिडिओ चर्चेत 


स्टेफ्री इंडीयाने आपल्या युट्यूब अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड केलायं. हा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चिला जात असून विशेषत: रिंकू राजगुरूचं यामध्ये कौतूक केलं जातंय.