मुंबई : वर्ष सरता सरता सगळ्यांनीच आपल्या 2018 या वर्षाच्या आठवणींचा उजाळा घेण्याचं ठरवलं आहे. या सरत्या वर्षात आपण का मिळवलं आणि काय गमावलं याचा एक आढावा आपण सारेच घेत असतो. असंच काहीस लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरूने केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमातून अवघ्या महाराष्ट्रालच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं. अभिनयाची कोणतीही जाण नसताना रिंकुने आपल्या पहिल्याच सिनेमातून अगदी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली. 


रिंकु राजगुरूने सैराट या सिनेमात आर्चीची भूमिका साकारली होती. आर्ची आणि परश्या ही 2017 मधील लोकप्रिय जोडी. पण या जोडीला वर्ष सरण्याने भीती नव्हती कारण ही जोडी वर्षानुवर्षे अजरामर होत असल्याची अनुभूती येत आहे. 


रिंकुने देखील 2018 हे वर्ष निरोप घेत असताना रिंकुने एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि आर्ची आणि परश्याचा म्हणजे रिंकुने तिचा आणि आकाश ठोसरचा एक फोटो शेअर केला आहे. 



हा फोटो इंस्टाग्रामवर असून अनेकांनी लाईक करून कमेंट देखील केले आहेत. आपल्याला माहितच आहे रिंकूने गेल्या काही दिवसांपूर्वी आपला लूक बदलला आहे. 


रिंकू राजगुरू अगदी बारीक झाली असून तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  




14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रिंकु राजगुरूचा 'कागर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मकरंद माने यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे ज्यामध्ये आर्चीचा अर्थात रिंकू राजगुरुचा हटके लुक दिसतो आहे.