Kantara Chapter 1 Or Kantara 2 Auditions : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी हा त्यांच्या 'कांतारा' या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयानं आणि दिग्दर्शनानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटासाठी ओपन ऑडिशन सुरु झाली आहे. हे एक ओपन ऑडिशन असणार आहे. ज्यात देशातल्या कोणत्याही भागातील व्यक्ती सहभागी होऊ शकते. कारण जर तुमचं या चित्रपटासाठी सिलेक्शन झालंच तर झालं. कारण 'कांतारा: चॅप्टर 1' या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर जर तुम्हालाही या चित्रपटात अभिनय करायची संधी मिळाली तर नक्कीच तुम्हालाही एक वेगळी संधी मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 मध्ये कांतारा या चित्रपटाता पहिला भाग प्रदर्शित झाला होता. कांताराच्या सक्सेसनंतर ऋषभ शेट्टी आता 'कांतारा: चॅप्टर 1' बनवत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्या टीझरला पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. तर ते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. जेव्हा हा टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी ऋषभ शेट्टीनं चित्रपटात सामान्य लोकांची भूमिका साकारण्यासाठी एक चांगली संधी दिली आहे. त्यानं 'कांतारा: चॅप्टर 1' साठी ओपन ऑडिशनची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्यानं यासाठी कसं अप्लाय करता येईल याविषयी देखील सांगितलं आहे. 



ऋषभ शेट्टीनं त्याच्या एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंचवरून ही माहिती शेअर केली आहे. त्यासोबत त्यानं सांगितलं आहे की ज्या लोकांना यातून शॉर्ट लिस्ट करण्यात येईल. त्यांचं ऑडिशननंतर ऋषभ शेट्टीसोबत होणार. त्यानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे की 'ज्यांना कलाकार होण्याची इच्छा आहे. त्यांनी या आणि कांताराच्या टीमचा भाग व्हा. आजचं अप्लाय करा. kantara.film च्या वेब साईटवर जाऊन तुमचं प्रोफाइल अपलोड करा.'


हेही वाचा : 'बुलबुलचा रेप सीन खूप...', 'ॲनिमल' मधील न्यूड सीनच्या चित्रीकरणाविषयी सांगताना तृप्ती डिमरीनं सांगितली खरी परिस्थिती


पुरुषांसाठी वयाची मर्यादा ही 30 ते 60 वर्ष आहे. तर महिलांसाठी 18 ते 60 वर्षांची मर्यादा आहे. दरम्यान, फक्त जे प्रोफेश्नल आहेत तेच नाही तर जे न्यूकमर्स आहेत ते देखील अप्लाय करू शकतात. ज्यांना अभिनय क्षेत्रात काही करून दाखवायचं आहे. ऋषभ शेट्टीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी रिअॅक्शन दिली आहे. प्रत्येकांनं त्यांचं त्यांचं नाव देत ऑडिशनसाठी अप्लाय केलं आहे. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचं बजेट हे 125 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. ऋषभ शेट्टी अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील करणार आहेत.