Rishab Shetty Kantara 1 : 2022 मध्ये 'कांतारा' प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. या चित्रपटाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. याच चित्रपटात ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटानं भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा आणली देशाला समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली. चित्रपटाच्या प्रीक्वल 'कांतारा चॅप्टर 1' घोषणेपासून सगळ्यांनी पुन्हा एकदा या बद्दल उत्सुकता दाखवली आहे. भूत कोला सणाचे प्रदर्शन करणाऱ्या 'कांतारा'मध्ये सगळ्यांनी पाहिल्याप्रमाणे कांतारा: अध्याय 1 मध्ये कदंब कालावधी समोर आणण्यासाठी आता सज्ज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कांतारा अध्याय 1' हा एक अद्भत प्रकारचा अनुभव असल्याचं वचन देतो. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते आणि त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला.


हेही वाचा : नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'


कदंब घराण्याचे महत्त्व, ज्यानं भव्य दक्षिण भारतीय वास्तुकलेची सुरुवात केली. कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो. 'कांतारा: अध्याय 1' या काळात सेट केला आहे. प्रीक्वल मधून चित्रपटाच्या विविध बाजू दिसणार आहेत. निर्माते या युगाची पुनर्निर्मिती करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसून ते हा चित्रपट साकारण्यासाठी अनेक आव्हान स्वीकारत आहेत. दरम्यान, आता सगळं काही पाहून सगळ्यांमध्ये असलेली उत्सुकता वाढली आहे.