नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'

Samantha Ruth Prabhu On Becoming Mother : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 13, 2024, 11:16 AM IST
नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu On Becoming Mother : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात सीरिजचं प्रमोशन करत असताना नागा चैतन्यसोबत घटस्फोटा झाल्याच्या 3 वर्षांनंतर आई होण्यावर समांथानं वक्तव्य केलं आहे. तिनं हे देखील सांगितलं की तिला नेहमीच आई होण्याची इच्छा होती.  

Add Zee News as a Preferred Source

समांथा रुथ प्रभूनं ही मुलाखत 'टाइम्स नाउ'ला दिली आहे. यावेळी समांथा ही तिच्या आई होण्याच्या स्वप्नावर बोलताना दिसली. समांथा म्हणाली, 'आता खूप उशिर झाला आहे असं मला वाटत नाही. माझं अजूनही आई होण्याचं स्वप्न आहे आणि हो मला आई व्हायला आवडेल. मला नेहमीच आई व्हायचं होतं. हा खूप सुंदर अनुभव आहे. मी त्याची प्रतीक्षा करत आहे. लोकं नेहमीच वयाला घेऊन चिंता व्यक्त करतात. पण मला वाटतं की आयुष्यात अशी कोणतीच वेळ येत नाही जेव्हा तुम्ही आई होऊ शकत नाही. आता तिच्या या व्हिडीओनंतर चाहते बोलत आहेत की समांथानं आता तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन केलं आहे आणि ती भविष्याचा विचार करत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षानंतर 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर समांथानं मायोसाइटिस या आजारानं त्रस्त असल्याचं सांगितलं. आता समांथा ही आधीपेक्षा आनंदी आहे. तिनं सांगितलं होतं की ती आधीपेक्षा आनंदी आहे. तिनं सांगितलं की मी आता माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या फेजमधून जाते. त्यासोबत मला हे माहित आहे की स्वत: ची काळजी कशी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. मला वाटतं की प्रत्येक दिवस आनंदानं जगायला हवा. 

सविस्तर वाचा : 'दीडफुट्या' राणी मुखर्जीला या नावाने हाक मारायचा 'हा' अभिनेता; 2 हिट चित्रपटांमध्ये केलं काम; 24 वर्षांपासून जोडी गायब

त्यानंतर आता 2024 मध्ये नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आणि त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

About the Author