मुंबई : अभिनेता ऋषी कपूर हे आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये  गेले आहेत. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून एक फोटो सतत व्हायरल होत आहे तो म्हणजे ऋषी कपूर यांच्या सफेद केसाचा फोटो. या फोटोत ऋषी कपूर खूप थकलेले देखील दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक फोटोत ऋषी कपूर आपल्या कुटुंबासोबत आणि बॉलिवूड कलाकारांसोबत दिसत आहेत. तसेच आता एक फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोत ऋषी कपूर आपल्या फॅमिलीसोबत न्यूयॉर्कमध्ये एका मंदिरात गेले आहेत. ऋषी कपूर यांना भेटायला आलिया भट्ट देखील पोहोचली आहे. 



आपल्याला माहितच आहे आलिया भट्ट अनेक दिवसांपासून रणबीरला डेट करत आहे. मात्र अद्याप या दोघांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण आलिया गेल्या कित्येक दिवसांपासून रणबीरच्या कुटुंबासोबत दिसत आहे. सोनाली बेंद्रे देखील न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार करत आहे. सोनाली आपला नवरा गोल्डी बहलसोबत ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना भेटण्यासाठी पोहोचले. प्रियंका चोप्रा देखील अनेक दिवसांपासून तिथेच आहे तसेच अनुपम खेर यांनी देखील न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांची भेट घेतली.